एका व्य़ंगचित्रात एक माणूस टेलिफोन बूथवरून फायर ब्रिगेडला फोन करून सांगतो आहे : तुम्हाला ताबडतोब सापडेल माझं घर- गल्लीतलं तेवढंच तर घर आहे,आग लागलेलं..
आपण रहातो,त्या घराचा पत्ता अशा तर्हेनं देणं यावरून आपलं अन घराचं नातं याबद्दल एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे आपली उपरोधाची तबियत. एका शायरने आपल्या प्रेयसीला घरी येण्याचं निमंत्रण देताना घराचा पत्ता असा दिला-
सारी बस्ती में फकत मेरा ही घर है बे-चिराग
तीरगी से आपको मेरा पता मिल जाएगा
( बे-चिराग : प्रकाश नसलेलं तीरगी : अंधार )
‘गालिब’ ची प्रेयसी घरी भेटायला आली, तर गालिबला त्यावर विश्वासच बसेना. तिचं घरी येणं ही ईश्वराचीच कृपा आहे असं वाटतं त्याला अन त्याची अवस्था काय होते?
वो आए घर में हमारे,खुदा की कुदरत है
कभी हम उनको कभी अपने घर को देखते है
आपलं घर.. आपण चोवीस तास घरात रहातो, पण जेव्हा कुणी वेगळं माणूस घरात येतं,तेव्हा हेच आपलं घर आपल्याला वेगळं वाटत असतं. आपण त्या दुसर्याच्या नजरेतून आपल्या घराकडे पहातो, आणि घराचं एक वेगळं रूप आपल्याला जाणवत राह्तं…
अब तक न खबर थी मुझे उजडे हुए घर की
तुम आए तो घर बे-सरो-सामां नजर आया (‘जोश’मलिहाबादी)
…तू घरात आलीस आणि लक्षात आलं माझं घर किती उजाड आहे…कसलंच सामान नाही घरात.
आपल्या या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तू खरं म्हणजे आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्यालाच सवड नसते आणि म्हणूनच त्याची खबरही नसते. जिवाला जेव्हा लागतं,घरात जेव्हा आपण एकले असतो, तेव्हा आपल्याला घरातली प्रत्येक वस्तू जणू विचारीत असते, आपल्याला त्यांचं ते विचारणं जाणवत असतं-झोंबतही असतं…
घर की हर इक शै पूछती है
कौन तुझको कर गया तनहा
…आणि मग एकलेपणा असह्य होतो. दारात उभं राहून तिच्या दिशेने आवाज द्यावा वाटतो,
तू जो आए तो इस घर को संवरता देखूं
एक मुद्दत से जो विरां है,वो बसता देखूं
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/
एखादे घर बांधुन तेथे प्रेयसी येण्याची वाट पाहनारे प्रियकर निराळे. आणि प्रेयसीच्या वाटेवरच घर बाधणारे निराळे यातील खरे प्रियकर कोण. घराला प्रेयसीच्या आठ्वणीने उजळ्वुण टाकणारे एक गाने या निमित्ताने आठ्वते.
तेरे रासतेपे हमने एक घर बनालीया है तेरी मुस्कुराहटोसे उसको सजा दिया है
तू आनेसे पहले आता है इक इशारा सुरज के पहले जैसे इक रोशनीकी धारा वोही इशारा हमने दिलमे बीठा लीया है, तेरे रासतेपे हमने इक घर बानालीया है……..
madhukarrao, ghara baddal aapan ekate aastana ya sobaat aapli preyasi aastana pahanycha drastikon kupach farak aasto, he ekdam barobar. ti aastana aaple ghar tila kase chhan watel hyacha prayatna karto aani tya drshtine aaplya gharat kanhi kamtata tar nahina he pahto.
Just read the blog. I remember some lines from Indira Sant’s poem……….
कुठे असेल ते गाव
जिथे आहे पोचायचे
कुठे असेल ते घर
जिथे आहे थांबायाचे ?
कुठे असेल तो स्वामी
त्याही वास्तूचा महान
ज्याच्या पायाखाली आहे
टाकवयाचे तन मन
Blog changla aahe.
R.K. Deshpande
mala marathi madhe lihayche aahe. kay karoo ?
punha vita punha maati
punha bandhayache ghar
punha kalya bahulis
tangayache aadhyavar
sangeeta.