हवेची हलकीशी झुळूक असते.तसं पाहिलं तर तिचं अस्तित्त्व ते काय-महत्त्व काय-काहीच तर नाही की. कसल्याच जड वस्तूंना या झुळका जाणवतही नसतात, त्यांना पत्ताही लागत नसतो.
पण शेतातली डुलणारी रोपं-गहू,साळ किंवा मोहरीची रोपं जेव्हा आपल्या बहराला घेवून उभी असतात,त्यावेळी हवेची झुळूक त्यांच्यावरून गेली,की पाहता पाहता सगळ्या रोपांचा एकत्रित पिसारा होतो,डुलायला लागतो.त्यांच्या त्या हलण्या डुलण्यात ना शब्द असतात,ना स्वर असतो. एक तेवढी लहर सगळ्या रानावरून फिरते अन सगळ्या पिकावर मोहोर उठतो,रोमांच उठतात. कसल्याही’बाह्य’ घटनेशिवाय होणार्याक या हालचाली,ही अस्वस्थता.
आतूरलेल्या मनांचंही तसंच असतं. त्यांना ना शब्दांची गरज ना संवादाची आवश्यकता असते. त्याशिवाय कधी स्थिती अशी येते,की ना शारीर-जवळीकीची मुभा असते ना साद प्रतिसादाचं स्वातंत्र्य असतं. अशावेळी सूक्ष्म संवेदनांची लहर येवून जाते अन केवढी अंदोलनं निर्माण होतात !
बज्म-ए-अगियार में हरचंद वो बेगाना रहे
फिर भी हात मेरा आहिस्ता दबा कर छोडा
चार लोकांसमोर ओळख दाखविता येत नाही. नजरेनेसुध्दा काही सूचीत करता येत नाही,सगळ्यांचं लक्ष असतं. अशा वेळेस सगळ्यांशीच हात मिळवणी करता करताच आपल्या माणसाने आपल्याशी हात मिळविताना, तो हलकासा दाबून धरल्यावर संवेदनांचं जे आदान-प्रदान होतं- त्याची खबर कुणालाही नाही,ही जाणिव आणि संवेदनांचा तो ‘निरोप’ यामुळे सगळ्या शरीरावर केवढे रोमांच उठतात… पण उदासीच्या संवेदना फार अस्वस्थ करणार्या असतात-
वक्त-ए-रुखसत,’अल्विदा’लफ्ज कहने के लिए
वो तेरे नाजूक लबोंका थरथ्रराना याद है…
निरोपाची ती सगळी भावना शब्दांपेक्षा थरथरणार्या ओठांत जी समावलेली होती, ती कायम मनात कोरून ठेवलेली असते.
असा निरोप फार बेचैन करून जात असतो. आपण निघून तर गेलेलो असतो,पण निघताना संवेंदनांचं जे आदान प्रदान झालेलं असतं, त्यामुळे ताटातूट होण्यापेक्षा माणूस एकजीव होवून जातो.
…आणि अशा एकजीव झालेल्या माणसाचं कशात म्हणता कशातच लक्ष लागत नाही…
हर मंजिले-हयात से गुम कर दिया मुझे
मुड मुड के राह में वो तेरा देखना मुझे
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
best of your article.verysubtle.
the only real comment on this article is–
just to press your palm -very gemtly.
खूप छान लिहिता तुम्ही. खरंच आवडल मनापासून. थांकु थांकु
Mazya 98xxx8xxxx ya mobilevarchi zulook tumachya kade yet asatech.. kadhee tumachya 98xxx20xxx cell chi zulook amachya paryant yeu dya rao. AAR KAY