मर्दूमशुमारी-खानेसुमारी,जनगणना ही राजाची गरज असते,राज्याची गरज असते. सामाजिक जीवनाचा एकंदर आवाका ध्यानात येण्यासाठी संख्याबळ जाणणं गरजेचं असतं. मग प्रशासन कामाला लागतं. माणूस माणूस मोजला जातो, त्याची स्थिती गती, अवस्था याचा आढावा घेतल्या जातो. त्याच्या भल्यासाठी ज्या काही योजना करायच्या असतात त्याची तयारी करता येते.
पण माणूस – तो कितपत तयार असतो अशा खानेसुमारीच्या कार्यवाही साठी ? लोकशाहीत माणूस स्वतंत्र असतो. त्याला त्याचं मत मांडण्याची मुभा असते. त्यावेळी असा माणूस प्रशासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागीही होतो, मतही मांडतो.
पण जिथे लोकशाहीचं राज्य नाही, जिथे राजा बोले-दळ हाले, अशी अवस्था असते, जिथे आणीबाणी सदृश्य स्थिती असते, तिथे सामान्य माणूस- त्याला स्वत:चं मत जाहीर करायला भीती वाटत असते. अशा स्थितीत मर्दूमशुमारीच्या कार्यवाहीत तो आपल्याबद्द्ल अशी माहिती देतो-
अब के मर्दूमशुमारी मे मैंने
बेजूबानी, जूबान लिखवाई
नाव-गाव-पत्ता देताना, जेव्हा भाषा-मातृभाषा विचारली जाते, तेव्हा नकळतपणे तोंडातून निघून जातं : जूबां ?…बेजूबानी…
जातीय तणाव,मतभेद द्वेष असं वातावरण असेल तर मग माणसाचं वैयक्तिक जीवन विचारूच नका. भयाने
माणूस गारठलेला असतो.एकमेकांवरचा विश्वास खलास झाल्याने, स्वत:ची ओळख द्यायला कचरतो. अशा स्थितीचं वर्णन ‘हरजीत’हा शायर कसा करतो पहा-
फसाद जब से हुए, हमने नही देखी है
किसी के नाम की तख्ती यहां मकानों में
निदा फाजली या शायरला मात्र या मर्दूम शुमारीचा वेगळाच अनुभव आला आहे. या शायरचा प्रस्ताव जर का प्रशासनाकडे ठेवला, तर प्रशासन चांगलेच अडचणीत येणार यात शंकाच नाही :
हर आदमी में होते हैं,दस बीस आदमी
जिसको भी देखना हो, कई बार देखना
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
मर्दूम म्हणजे काय ?
पुरुष ?
होय.पुरूष,माणूस.