‘मिर्जा गालिब’ चित्रपटात एक दृश्य आहे : गालिब आणि त्याचे मित्र आंबे खात आहेत. आंब्यांची तारीफ होते आहे; त्याच अनुषंगाने गालिब एक शे’र ऐकवितो. पण हा शे’र मोठा अवघड असतो. गालिबचा सहकारी सांगतो-‘शे’र समझ में आया, तो दाद मिलती है, नही तो फर्याद ( तक्रार ) होती है’. गालिब हे ऎकून स्वत:शीच हसतो. त्याच वेळेस रस्त्यावरून एक फकीर गाणं गाता गाता तिकडे येतो. हे गाणं म्हणजे, गालिबचीच एक गजल असते. या गजलमधला एक शे’र असतो-
यारब ! न वो समझे है न समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको, जो न दे मुझको जुबां और
… मला दुसरी भाषा-दुसरी तर्हा तू देवू नाही शकलास तर देवा त्याला तू दुसरं ह्रदय तरी दे !
( तिला दुसरं ह्रदय दे- जेणे करून माझी प्रेमाची भाषा तिला कळेल.)
हाच मिर्जा गालिब जेव्हा स्वत:च्या विवंचना-दु:खांमुळे बेजार होतो, तेव्हा मोठ्या उद्वेगाने ईश्वराला म्हणतो-
मिरी किस्मत में गम गर इतना था
दिल भी यारब ! कई दिए होते..
दु:ख सोसण्यासाठी अधिक बळ आणि आपली भाषा समजून घेण्यासाठी उत्सूक असणारी भोवतालची मानसिकता –
… आणखी काय हवं असतं आपल्याला…
please visit
दु;ख आणि त्यादरम्यानच्या लोकाच्या प्रतिक्रिया फार कमी सुखकारक आणि जास्त क्लेष दायक वाट्तात.
bhavbhuti ya sanskrit mahakavilahi ha problem face karava lagla tithe aple kay
u dont understand what i exactly mean
this is the most common complain ,
bhavbhuti has given a very famous and positive lines in this regard
aj jari mazya sahity nemke umajnara kuni nasla tari kay zale , jag kup mothe ahe ani kal anant ahe
be sure
vipulach prithvi kalow ananta
I am looking for the complete shloka of bhavabhuti with those lines…
found it.
जागर्तु कोsपि वसुधावलयेsनसूयः सन्मार्मिकः प्रयतनं हि तदर्थमेतद् । उत्पत्स्यतेsत्र मम कोsपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिः विपुला च पृथ्वी ।।
(from a comment in http://stotram.lalitaalaalitah.com/2011/11/quotable-quotes-from-sanskrit-classics.html )
छान!
शायर तर्कशुद्ध विचार करतात हं!
lk यांच्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने…
मला वाटतं तसं नाही इथे. प्रेमाच्या-दु:खाच्या ह्या भावना आहेत. या शायरला त्याच्या भावनांचा ‘तुरंत इलाज’ पाहिजे आहे. आपल्या प्रेमाची भावना तिला (आणि तिलाच) लौकरात लौकर ‘डिलिव्हर’व्हावी ही त्याची घाई;आणि त्याची साद तशीच परत येत आहे, या अडचणीतून तो हे म्हणतो आहे.तारुण्याचा मर्यादित कालावधी अन तिला ते समजायला विलंब,हा तो पेच आहे.
दु:खाचंही तसंच.मर्यादित आयुष्यात अपार दु:ख वाट्याला आलं,तर ते सोसावं कसं…त्यासाठी ईश्वरानेच सोय करून द्यावी असं त्याचं म्हणणं.
सुख-दु:ख,प्रेमाच्या या भावना;या भावनांना लगबगीने या मूठीतून त्या मूठीत जायची घाई असते.
भवभूतीची ती ओळ अशी आहेः
उत्पत्स्यते मम कः अपि समानधर्मा
कालः हि अयम् अनन्तः
विपुला च पृथ्वी।।
थोडं विषयान्तर॰॰॰॰
गालिब मित्रांसोबत आंबे खातानाचा प्रसंग मिर्झा ग़ालिब मालिकेतही आहे. एका मित्राला आंबे आवडत नसतात, तो खातही नसतो. इतक्यात जवळून जाणाऱ्या गाढवापुढे आंबे (उरलं सुरलं) टाकले जातात. तोही तोंड लावत नाही. आंबे न खाणारा मित्र लगेच म्हणतो,” देखो, गधा भी आम नहीं खाता.” त्यावर ग़ालिब शेरा मारतो, “गधा है, इसीलिेए आम नहीं खाता.”