बहोत मुश्किल है दुनिया का संवरना
तेरी जुल्फों का पेचो-खम नही है.. ( पेंचो-खम : केसांच्या बटा )
– ‘ मजाज ‘
प्रेम करणं, आशिक होणं, कविता करणं, तिच्या मागे लागणं-आठवणीत रहाणं हे सगळं सगळं भरल्या पोटानंतरच्या गोष्टी आहेत. माणूस भुकेनं जेव्हा हैराण असतो, तेव्हा त्याला कसली आली शायरी सुचायला ;अन कसलं आलंय प्रेम बिम, आं ! ते सगळं सुरक्षीत झाल्यावरचं, पोट भरल्यावरचं प्रकरण असतं.माणसाला यश जसं मिळतं, तसंच विवंचनाही असतात.कष्ट असतात. आजूबाजूला भोवताली जी जगण्याची धडपड चालू असते, ते पाहून संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो. आयुष्याच्या खडतर वाटचालीत माणूस बेभान होतो,हातातोंडाची गाठ पडायची मारामार होते. त्या वेळी या सगळ्या प्रेमींबद्द्ल तो जणू वैतागून म्हणतो –
कहां के वो हिज्र-ओ-विसाल, कहां के वो हुस्न-ओ-इश्क
यहां तो लोग तरसते है, जिंदगी के लीए ...
( हिज्र : विरह . विसाल : मिलन हुस्नो-इश्क : सौंदर्य,प्रेम )
मिर्झा गालिबला, एकाने आपल्या पुस्तकासाठी ( अर्थात कविता संग्रह असणार ) प्रस्तावना लिहायची विनंती केली होती. त्या वेळी गालिबचे दिवस मोठे कठीण होते. आर्थिक विवंचना- आजार, कौटुंबीक समस्या चालू होत्या. शायरी वगैरे बाजूला राहिली होती. अशा मन:स्थितीत काय प्रस्तावना लिहिणार ? या प्रस्तावनेच्या संदर्भात त्याने आपल्या मित्राला एका पत्रात ( 2 जून 1855 ) वैतागाच्या दोन ओळीच लिहिल्या-
गया हो जब अपना ही जेवडा निकल
कहां की रुबाई, कहां की गजल
( या ‘जेवडा ‘ शब्दाचा काही अर्थच मिळेना. ना शब्दकोषात, ना कुण्या मित्राकडे. पण काही तरी शारिरीक व्याधीमुळे कलाम पेश करायला अडचण यावी असं काहीसं ते प्रकरण असावं असं वाटतं.एका मित्रानं सांगितलं, जीव – प्राण याच्याशी संबंधीत हा शब्द आहे. )
‘ दिदी ‘ सिनेमात साहिरची रचना गाताना सुधा मल्होत्रा म्हणते- तूम मुझे भूल भी जाओ, तो ये हक है तुमको / मेरी बात और है, मैने तो मुहोबत की है
आणि मुकेश तिला वास्तवाची एक वेगळी जाणिव करून देतो- वास्तवाकडे तिचं लक्ष वेधतो-
जिंदगी सिर्फ मुहोबत नही कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुख्सार की जन्नत नही, कुछ और भी है
भूक और प्यास की मारी हुवी इस दुनिया में
इश्क ही एक हकिकत नही कुछ और भी है
तरूणपणात आपल्या कोषातून बाहेर पडल्यावर वास्तवाची-प्रखर वास्तवाची जाणिव होते. समाजातली सुख दु:खं,विवंचना-कष्ट या सगळ्यांची जाणिव करून घेताना मनातल्या त्या रोमांचाचे क्षण-तप्त जमिनीत पाण्याचे थेंब विरावेत तसे विरून जातात.
मात्र अशा तल्खीच्या वातावरणात निकटची स्त्री;तिचा सहवास,तिच्या संवेदना सावली सारख्या वाटतात.
या दोनही भावना, हे दोनही अनुभव प्रत्ययकारी तर्हेने या गाण्यात उतरले आहेत.
सुधा मल्होत्रा- अत्यंत गुणी गायिका-संगीतकार.
* [निमंत्रण : नवीन ब्लॉगच्या भेटीचे –http://hasanyachaaakar.wordpress.com/] *
sudha maljhotrache gane athaun dilya badal dhanyawad,farch chan gane . navin blog baddal subhecha
khup diwsanni he gane athavun dilet
ya ganyachi ek athwan mhanje
yachya dhrupadat ti je mhanate tyachya ulat kadwyatle shabd ahet
kadwyatlya themela samantar te gane apoap athawate
pyar se bhi jaroori kayi kam hai
pyar sabkuch nahi admike liye
Sudha Malhotra che ekch gaane mahit hote, shukratara..
jar tuza context nasta tar mi he asha bhosalech thodya veglya style ne gate aahe ase samjlo asto.
anyway.. very nice reading your blogs.. felt like we were chatting sitting on the front porch on weeknd summer nights after meals.. especially when there is a wedding in the family