पूर्वी रात्री साडे दहाला ऑल इंडिया रेडिओवर गाण्यांचा कार्यक्रम असायचा. आताही असणार. ‘ त’अमील-ए-इरशाद’ असं त्या कार्यक्रमाचं नाव. या शिर्षकाचा अर्थ लागायला काही वर्षं गेली. ( त’अमील : अंमलबजावणी,कार्यवाही. इरशाद : आदेश, हुकूम ) तो कार्यक्रम, रात्रीची वेळ,गंभीर गाणी आणि त्या निवेदकाचं सांगणं हे सगळं आयुष्याचा एक हिस्सा बनून राहिलं आहे. उत्तम उर्दू भाषेत, सावकाश आणि धीरगंभीर आवाजातलं ते निवेदन असायचं. फर्माइश सांगितल्यावर गाण्याच्या मूडशी संबधीत तो काही सांगायचा. ते सांगणं एवढं परिणामकारक असायचं, की मनाची अवस्था मेणासारखी व्हायची. … अन् त्यानंतर लागणारं गाणं त्या मनावर रूतून बसायचं. अशा कितीतरी गाण्य़ांच्या मुद्रा या ‘ त’अमील-ए-इरशाद ‘ने उमटविलेल्या. त्यापैकी ही एक मुद्रा :
… सकाळी सकाळी वेलीवरच्या त्या सगळ्या फुलांवर दव साचलेलं होतं. प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीवर दवाचे थेंब दाटून आलेले. अशा फुलांनी डवरलेली ती वेल कशी श्रांत-क्लांत वाटत होती…
निवेदकाने आशा भोसलेच्या गाण्याची फर्माइश सांगितली. गाणे लावण्यापूर्वी क्षणभर थांबून ( हा थांबणारा क्षणसुध्दा लक्षात आहे..) आपल्या भारदार गंभीर आवाजात मग त्याने एक शे’र एकविला :
अश्कोंसे तर है फूल की हर एक पंखुडी
रोया है कौन थाम के दामन बहार का
आणि मग गाणं सुरू झालं.. पथ भूला इक आया मुसाफीर / लेके मेरा मन दूर चला… बिखरे सपने, रह गई यादें /रात के पहले चांद ढला… ( दूर गगन की छांव में )
गाणं ऎकताना तो शे’र जणू डोळ्यांसमोर उभा राहिला. आजही उभा राह्तो. … वसंत आता निघून जातो आहे. त्याला थांबणं शक्य नाही. बागेत तो आला, रुळला, सगळ्यांना हसविलं-फुलविलं आणि काल… हो, कालच्या रात्रीच तो निघून गेला आहे. त्याचं जाणं अस्वस्थ करणारं होतंच; पण हे काय- सगळ्या फुलांच्या या सगळ्या पाकळ्या कशा दवाने भिजून चिंब झालेल्या.. वसंताचा हात धरून कोण बरं रडलं आहे…
आशा भोसलेच्या आवाजातलं ते दु:ख, ती वेदना आणि गाण्याच्या शेवटी तिचे ते अनावर हुंदके – काळजाला घर करून जातात…
बहार आलेल्या त्या बागेत कुणी तरी आपल्या जाण्याबद्द्लचं बोलत आहे अन् ते ऎकून लाजणार्या बुजणार्या कळ्या अस्वस्थ होत आहेत, कावर्या बावर्या होत आहेत, अशा आशयाचा एक शे’र आठवतो :
चमन में कोई बातें अपने जाने की सुनाता है
गुलों का एक रंग आता है, एक रंग जाता है
पण तो जाणारा… त्यालाही कुठं जावं वाटत असतं. त्याचंही मन रमलेलं असतं. ओढ असते, जावसं वाटत नसतं. पण निसर्ग आहे, जावं लागणार, परिस्थिती अशी येते की जाणं जरूरीचं होवून बसतं. मोठ्या उदासीने तो स्वत:ला सांगत निघतो :
अब तो वापसी का सवाल ही नही
आंसूओं की तरहा घर से निकल पडे
… हे अनाम शायर… यांना माझा सलाम.
मस्त!
तुमचं विवेचन फारच छान आहे.
काही वेळा सगळंच इतकं तरल असतं, आपण तिथून पाऊल न वाजवता निघून जावं असं वाटतं
इथेही प्रतिक्रीया लिहून त्या सुंदर विवेचनाला धक्का तर लावत नाहीये ना? (असं मनात येऊन गेलं)
खूप सुंदर!
हे वाचल्यावर ‘एक वेस ओलांडली’ मधल्या ओळी आठवल्या.
(त्या गुंतलेल्या प्रवाशाचंच मनोगत?)
उसासे फुलांचे, खुलासे सलांचे
का मी ऐकतो?
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो
पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो
गाव दूर दूर थांबले…
एकट्याच वाटेस ह्या, दिशांनीच सांभाळले
उर्दू भाषा ही कठीण, जड जंबाळ शब्दांची असते, शायरीतला अर्थसुध्दा गडद भव्य असतो, असं आपलं मत असतं. ( पुष्कळ अशीं ते खरं ही असतं.) पण कधी तळहातावर पारा घेवून यावं, तसा एखादा शायर आपल्याला भेटतो. आणि भक्कम शरीराच्या माणसाला हळवं झालेलं पाहताना वाटावं, तसं या भाषेबद्दल
वाटत राहतं…
धन्यवाद !
very beautyful
u r using a styl which u have used very rarely in past and that too very briefly
tumhi taral lihu shakta lihita he tar purvich sarwana disat hota pan he sadar tumchya ya khas kshmatechi sarvochh udaharne denare tharanar he nakki
miles to go before i sleep
ya kavitetil manasthiti shevatchya sher madhe ahe na
शेर तर सुरेख आहेतच; पण मला त्याहुनही जास्त भावले ते तुम्ही केलेले तुमच्या मनाचे वर्णन! “मनाची अवस्था मेणासारखी व्यायची आणि मग त्यानंतर लागणारं गाणं त्यात रुतून बसायचं”…आणि गाण्याची मुद्रा उमटायची.—मस्त वाटलं वाचायला!
– सचिन