गेली दोन वर्षं हा ब्लॉग लिहिला, याला बर्याच जणांचा छान प्रतिसाद मिळाला.
आता हे ब्लॉग लेखन पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले आहे, त्याचा हा तपशील-
उर्दू शे’रचं आकर्षण प्रत्येक रसिकाला असतं. आणि हे शे,र आपल्याला कुठेही
भेटत असतात- निवेदनातून, गाण्यातून, लेखनातून, व्याख्यानातून किंवाअ साध्या
गप्पांतून. या शे’रचं वैशिष्ट्य असं, की जाता जाता आपण मुख्य विषय विसरून
त्यापाशी घुटमळतोच. एखाद्या वचनासारखं रूप असलेल्या या दोन ओळी काव्याची
प्रकृती जपून असतात. एखाद्या विषयावरचे शे’र घेऊन रमत गमत केलेला हा
आस्वाद-प्रवास; उर्दू शायरीबद्दल प्रेम आणि समज वाढविणारा….
प्रकाशक :: मीरा बुक्स ऍंड पब्लिकेशन,
2, साई कॉम्पलेक्स, न्यू एस बी एच कॉलनी,
सहकार नगर, औरंगाबाद 431005
दूरध्वनी : 0240 -2340414
मूल्य : रू 110/-
आस्वादक रसिक सर्वदूर पसरलेले आहेत. सर्वांकडेच इंटरनेटची सुविधा असतेच असे नाही. त्यांच्यासाठी नव्हे तर सर्वांसाठीच ही खास मेजवानी आहे. सर्व रसिक वाचक भरभरून प्रतिसाद देतील याची खात्री आहे.
-रवींद्र जगताप
अभिनंदन..पुस्तक बघायलाच हवं…
वा!
पुस्तक बघायला हवं!
— विद्या