शमा परवाना यांच्या आकर्षणाच्या हकिकतींनी उर्दू शायरी उजळून गेलेली आहे. मैफिल मध्ये
शमा आहे, परिसरात अंधार आहे;त्यामुळे शमाचे भोवताल कसे उजळलेले आहे…आणि हा उजाळा परवान्यांना मोहक असं आकर्षण निर्माण करणारा आहे,आणि ते तिकडे झेप घेतातच.
तथापि उर्दू शायर लोकांनी या परवान्याला स्वत:चा नातेवाईक बनवून टाकलेले आहे. परवान्यामध्ये त्यांना आशिक-आशिकीचा खेळ दिसतो. सौंदर्याकडे झेप घ्यायची ती रोमॅंटिक वृत्ती वाटते.प्रेमाच्या व्यवहाराचे ते प्रतिक झालेले असते-परवान्याचे ते झेप घेणे. म्हणून तर एका शायरने परवान्याची पैरवी अशी केली आहे-
कुछ शमा की लौ ही में तासिरे-कशिश होगी
होता नही परवाना हर आग का शैदाई
( तासिरे-कशीश : ओढून घ्यायची शक्ती शैदाई : वेडा )
शमाच्या त्या अंगठ्याभरच्या ज्योतीतच अशी काही ओढून घ्यायची शक्ती असेल,की ज्याच्या मुळे परवाना तिच्याकडेच आकृष्ट होतो-तो इतर आगीच्या आधीन होत नसतो. आकर्षीत करून घ्यायची ही जादू केवळ शमामध्येच असते, असं शायर म्हणतो.
शमा-परवाना यांच्या आकर्षणाच्या हजार गोष्टी प्रचलीत आहेत. तथापी हे आकर्षण केवळ त्यांच्याबाबतीतच नसून कला आणि कलेचे रसिक यांनाही तेवढेच लागू होते. इतकेच नाही, तर कलेचा केवळ एक रसिक नसतो,तर हजारो-लाखो रसिक कलेचे वेडे होवून गेलेले असतात. त्या कलाकृत्तीतच तशा प्रकारची ओढून घ्यायची शक्ती असते.
अर्थात चेहर्यावरचे सौंदर्य हीसुध्दा एक और बाब असते. विशेषत: सौंदर्यपूर्ण चेहरा दिसला,की त्याबद्दलचं आकर्षण-त्या आकर्षणाने बध्द होतो माणूस. अशा आपल्या सौंदर्याचा अभिमान आणि आत्मविश्वास बाळगणारी एक सौंदर्यवती तर परवान्याला आवाहन करते:
रूखे-रोशन के आगे शमा रखकर ये कहते है
उधर जाता है देखें,या इधर आता है परवाना
आशिक या सिनेमात शमा-परवान्याचा कसा संवाद आहे पहा-
प्रतिक्रिया व्यक्त करा