संवेदना जास्त उत्तेजीत झाल्या, की त्या संवेदनांची अभिव्यक्ती ठळकपणे होणं स्वाभावीक असतं. सुख दु:खाच्या भावना तीव्रतर झाल्यावर हळूवार तर्हेने,सूचक तर्हेने ते सुख दु;ख व्यक्त होणं कठीण होतं. अवख़ळपणाने त्या भावना व्यक्त होतात आणि असं व्यक्त होताना सरळ सरळ सांगितलं जातं किंवा जीवन व्यवहाराचे नियम भक्क शब्दांत आकाराला येतात. नशेचा अंमल वाढला की, असं हमखास होतं.
या भावना गडद तर्हेने व्यक्त होणार्या. कोल्हापूरी मटनाचा तांबडा-पांढरा रस्सा मनसोक्त ‘ओढताना’ डोळ्यात पाणी यावं अन मजाही यावी, तसं उत्तेजनेच्या मन:स्थितीत जीवन व्यवहाराबद्दल विचार-भावना-तत्त्वद्न्यान कसं तिखट आग असलं की पोट भरतं.
हिंदी गाण्यात मुजरा ही अशी भूक क्षमविण्यासाठी योग्य प्रकार. मुज्रा म्हणजे, कलावंतिणीने बसून म्हटलेले गाणे असा त्याचा अर्थ आणि आणखी एक अर्थ म्हणजे, कमी केलेला-वजा केलेला. दोनही अर्थ सिनेमातल्या मुजर्याला लागू होतात. ‘ठुकरा रहा था मुझको कई दिन से ये जहां,आज मैं इस जहां को ठुकरा के पी गया’ असा साहिरचा नायक ( प्यासा ) म्हणतो,ते कलावंतिणीच्या बैठकीत येवूनच.मुजर्यातसुध्दा अशा भावना कशा रस्सेदार तर्हेने व्यक्त होतात पाहा –
जो लुटते मौत के हाथों,तो कोई गम नही होता
सितम इस बात का है जिंदगी ने हमको लूटा है
आणि गंमत म्हणजे याची अनुभुती येते ते तिथेच- तिच्या कोठ्यावर !अर्थात आपली कोठी म्हणजे थिएटर !
या मुजर्याची शब्द रचना अगदी त्या मन:स्थितीला योग्य अशी. साजेशी अशी. भडक शब्दांत सुख दु:ख-विशेषत: स्वत:च्या दु:खाचं उदात्तीकरण हे या मुजर्याचं वैशिष्ट्य. ‘भरोसा कर लिया जिस पर उसी ने हमको लूटा है,’ किंवा ‘सनम तू बेवफा के नाम पर ‘ ही अशी काही उदारहरणं..
Mujara ha blog wachala. Ata vastavatalya ‘kothya’ shillak rahilya nasateelach. Apan cinemat pahilelya Kothya ya wastavachya jawalpaas tari hotya kay asa prashn mala padato. Mujara ya shabdache shabdkoshateel arth mala nave watale. Lekhabaddal apale kautuk.
R.K. Deshpande