लहानपणात कुणी घसरून पडलेलं पाहिलं की अगदी खळखळून हसू यायचं. माणसाची फजिती आणि त्याचं खजील होणं याच्या एवढं करमणूकीचं प्रकरण दुसरं काही नसायचं. पुढे जसजसं मोठं होत गेलो, तसतसं त्यातली करमणूक कमी कमी होत गेली-म्हणजेच हसू कमी कमी होत गेलं. आता जेव्हा असं वय आलेलं आहे-ज्या वयात हात पायाला फ्रॅक्चर झालं तर किमान दोन महिने ते जुळणार नाही, याची जाणिव झाली आणि कुणी समोर घसरून पडलं तर चटकन त्याच्या मदतीला धावावं वाटतं;त्याला काही जास्त तर लागलं नाही ना या विचाराने अस्वस्थ होत रहातो.
जीवनव्यवहारातले टक्के टोणपे खाल्ल्यावर आता हसण्याचे विषय बदलले आहेत;किंबहूना आता हसण्यासारखं काही आहे का राहिलं,याचा विचार येतो आहे. पक्ष्याला पिंजर्यात द्डपून ठेवणं,पिलाला बांधून ठेवणं हे सगळं आता अघोरी वाटत आहे. जाणिवांचं स्वरूप बदललं की कसा अनुभव येतो पहा : अंत्यविधीच्या वेळेस मुतदेहावर उदबत्ती लावलेली, साबणाने त्याला स्नान घालून अत्तर लावलेलं एकदा जवळून पाहिलं-ते अनुभवलं, त्या सगळ्यांचे वास मनात असे भरून राहिले होते, की पुढे किती तरी दिवस या वासांना संदर्भ लागायचा तो संपून जायचा. वस्तू त्याच, ज्यांचा नेहमी वापर होतो, मनाच्या उल्हासासाठी,भक्तीच्या-मंगल वातावरणासाठी; पण कधी संदर्भ बदलले की विपरीत होवून जातं. एक शायर सांगतो-
एहसास के अंदाज बदल जाते हैं वर्ना
दामन भी उसी तार से बनता है कफन भी
…एकाच सूताने-एकाच धाग्याने दोनही वस्त्रं विणली असतात; पदराचे ते वस्त्रच आणि मृतदेहावर पांघरायचं कापड;ते पण त्याच धाग्याने बनलेलं की ! पण जाणिवेचे पदर वेगळॆ झाले की भावना बदलून जाणार…
एकाच धाग्याने बणलेली वस्त्रं जशी वेगळी वेगळी असतात तसंच माणसांचं ही असतं. अगदी ‘फिल्मी’ भाषेत सांगायचं झाल्यास एकाच आईचं एक पोरगं चोर तर एक पोरगं पोलीस असतं. एक सभ्य तर एक वाईट मार्गाचा. एकाचा वावर अंधारात तर एक प्रकाशाकडे जाणारा…
डॉ. इक्बाल यांनी अशीच एक तफावत सांगितली आहे-
परवाज है दोनों की इसी एक फिजां में
करगस का जहां और है,शाहीं का जहां और
एकाच वातावरणात दोनही पक्षी वावरतात, एकाच आभाळाखाली झेप घेतात- ससाणा आणि कावळा;
पण दोनही पक्ष्यांची प्रकृती वेगळी, दोघांचं विश्व वेगळं…
जाणिवेचे स्वरूप
जुलै 15, 2011 Madhukar Dharmapurikar द्वारा
faarch chaan. he vachlya nantar mala Phir Subah Hogi madhil Asha Bhosle che Do Boonden Sawan Ki ya gaanyachi athvan zali.
वा ! संवेदना तीव्र झाल्या की त्यांना स्मृतीही साथ देते याचे हे उदाहरण.उद्या या गाण्याचा आस्वाद घेऊ या…
नमस्कार ,
तुम्ही पाठविलेली लिंक आणि त्यावरील मजकूर वाचला. बदललेल्या जाणिवा आम्ही अनुभवतच आहोत पण त्यांचे तुम्ही केलेले प्रगटीकरण वाचल्या नंतर पुन्हा प्रत्ययाची ( चांगली व कधी कधी वाईट सुद्धा ) अनुभूती मिळते. आठवणींच्या धागे यांचे केलेले एक छोटेसे फडके आता महावस्त्र बनू लागले आहे. फक्त त्याचा वापर उत्तरीय म्हणून की उत्तरक्रियेत होईल हे येणारा काळच ठरवील.
आर. के. देशपांडे
Wah.Apratim.
Wah,Apratim.
atishay chhan. manala spsrshun janara lekh.
ahesas ke andaj badal jate hai…..va .va.
tech khdyapadarth ,toch ladu kinva kahi sweet ….pan kontya nimittane – yavarun ahsascha andaz badalto.
tich kadhitari bhural ghalun geleli dhun,oli,bhajan,
pan sthal ani prasangacha sandarbha badalala ki badlun jato ..ahsas ka andaj
far chhan lihilet.