कुणाची प्रतीक्षा करणं म्हणजे वाढत जाणारा ज्वर सोसणं. प्रतीक्षा सुरू केव्हा होते-जेव्हा नियत वेळ ओलांडली जाते. कधी कधी ही नियत वेळ जेव्हा आपण स्वत:होवूनच अलिकडे-अगदी अलिकडे आणतो अन वाट पहायला सुरूवात करतो,तेव्हा खरं म्हणजे त्यावेळी ती प्रतीक्षा नसते बरं, ती असते अभिलाषा. उतावीळपणा,उत्सुकता. प्रतीक्षा करणार्याीची नजर वाटेकडे केंदित होवून बसलेली असते आणि त्या नजरेसोबत सगळं शरीर,सगळ्या हालचाली इतकंच काय श्वाससुध्दा तिकडे-त्या तिकडे लागून राहिलेले असतात.
आ,के मुंतजिर है बज्मे-गुलिस्तां तेरे लिए
महकी हुई है देर से सांसे गुलाब की
( मुंतजिर : प्रतीक्षा करणारा. बज्मे-गुलिस्तां : बागेची मैफल )
…बागेची ही मैफल सजलेली आहे,प्रतीक्षा करीत आहे.कुणाची प्रतीक्षा आहे बरं या उपवनाला..उपवनातले गुलाबसुध्दा अगदी उत्सुक होवून वाट पहात आहेत,त्यांचे श्वास त्या आगमनाच्या प्रतीक्षेत घमघमू लागले आहेत. कुणाची बरं असावी ही प्रतीक्षा…उपवनाला प्रतीक्षा कुणाची असणार- वसंताची;नाही का! बाग आणि बहार हे नातंच असं आहे. त्यांना एकमेकांची ओढ असणारच.
पण हा प्रतीक्षेचा ज्वर जसजसा वाढत जातो, तसतसं अस्वस्थ वाटत जातं. चुळबुळ होत रहाते. आठवणी,विचार आणि कल्पना यांची मनात जणू दंगल सुरू होते. येण्याची खात्री असल्यावर तर मग काय- तो साक्षात झाला आहे याचेच भास होत रहातात. ‘जिगर’मुरादाबादी तर गाण्यासाठी,संगीतासाठी एकदा एवढा उत्सुक झाला होता,की त्याला त्या वाद्यातून गाणं चक्क ऎकायला येवू लागलं होतं की !
गोशे-मुश्ताक की क्या बात कहूं अल्लाह अल्लाह !
सुन रहा हूं मैं वो नग्मा,जो अभी साज में है
( गोश : कान, गोशे-मुश्ताक : उत्सुक,आतूरलेले कान)
आणि माणसाची ही अशी उत्सुकता जर त्याच्या प्रिय व्यक्तीशी निगडीत असेल तर मग काय विचारता! हा जो संघर्ष आहे-प्रियतमेसोबतच्या जवळीकतेचा,दुराव्याचा; त्यात ह्रदयाचं स्पंदन हे शारिरीक चलनवलनाची कृती न रहाता भेटीच्या धडपडींची हालचाल होवून जातं-जणू आजाराची बाधा होवून जाते.मिर्जा गालिब आपल्या या ह्रदयाचा (मनाचा) समाचार घेताना ( दिले-नादां तुझे हुवा क्या है,,,) विचारतो-
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्या है
(बेजार: उदास,नाखुश या इलाही : हे माझ्या परमेश्वरा! माजरा: मामला,भानगड )
आम्ही एवढे उत्सुक आहोत अन ती चक्क उदासीन-आं! देवा, हा मामला काय आहे ? काय झालं?
‘मिर्जा गालिब’सिनेमात या ओळी सुरैय्याच्या तोंडी असल्याने आपली ( हो, आपलीच, गालिबची नाही ) ‘मुश्ताकी’ अधिक होवून जाते !
प्रतिक्षा आणि अभिलाषा
जुलै 1, 2011 Madhukar Dharmapurikar द्वारा
प्रतिक्षा आणि अभिलाषा!!
मस्त!
Apan lihilele Tasbeeh aani Pratiksha v Abhilasha he donhi blogs wachale. Maja aali. Nanded la alyapasoon internet access kami zala aahe. Pan aajacha diwas tumachya blog wachanamule chchaan jail.
R.K. Deshpande
Farach chhan.’Grace’yanchi ek kavita athavali.
Pratyaksh bheteet dein.
माझ्या ई-तुका नामक ब्लॉगवर मी तुकारामाच्या गझला असा एक लेख लिहिला आहे. तुम्हाला तो आवडेल. पाठविण्यासाठी मला तुमचा ई-मेल खालील ईमेलवर कळवाल का ?
arunbhalerao67@gmail.com
मी पण ह्याच साईटवर एक ब्लॉग सुरू केलाय. hello world . त्यात हा तुकारामाच्या गझला हा लेख टाकला आहे. अवश्य वाचा.
arunbhalerao67@gmail.com
माझ्या ब्लॉगची लिंक आहे:
http://arunbhalerao.wordpress.com/2011/07/14/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A4%BE/