‘अकबर’इलाहाबादी यांच्या शायरीत व्यंग असतं,विनोद असतो आणि व्रात्यपणाच्या जवळ जाणारा असा अवखळपणा असतो. शायर; अन तो सुध्दा शराबने किंवा आशिकीने एकदा का बेभान झाला की त्याच्या त्या बेभानवृत्तीला, ‘पिसाळला’ की काय ! असंही म्हणावं वाटतं. तशा कल्पना ‘अकबर’ यांच्या शायरीत उसळलेल्या असतात. आता याच शे’रचं उदाहरण पहा –
किस नाज से कहते हैं वो झुंझला के शबे-वस्ल
तुम तो हमें करवट भी बदलने नही देते
( नाज: हावभाव, नखरा झुंझला के :वैतागून ) मिलनाच्या रात्री त्याच्य अवखळ उत्साहाची तीव्रता एवढी वाढलेली असते, की त्याच्या तशा वागण्याने वैतागून ती म्हणते,- अरे ! तू तर मला कूसही बदलू देत नाहीस !
….आणि जेव्हा नाराजी होते,माणूस मनात राग धरून असतं,तेव्हा हीच वागण्यातली तीव्रता टोकाला जाते. एवढी की त्याचा संपर्क तर दूरच राहिला,त्याच्या गल्लीतून जातानासुध्दा क्षणभर थांबायची तयारी नसते. ‘गालिब’ला अशा तीव्र नाराजीच्या वागण्याचा अनुभव आला-
पिनस में गुजरते हैं जो कुचे से वो मेरे
कंधा भी कहारों को बदलने नही देते
(पिनस : मेणा,डोली. कुचा : गल्ली कहार : मेणा वाहून नेणारी माणसं )
तीला जेव्हा लक्षात येतं,की आपण त्याच्या घराजवळून जातो आहोत, तर आपल्या माणसांना ती खांदा बदलायची उसंतसुध्दा घेऊ देत नाही.
-नाराजीची ही केवढी तीव्रता म्हणावी ही…
It is a great selection and also great meathod of expalanation.
Pleased to read ur article (naraajeechi) teevrata. Yesterday I reached MuzaffarNagar ( My son’s SASURWADI) and today got the chance to see the net. Also got the INVITATION CARD of Pustak Prakashan and Pragat mulakhat conducted by Dr. Mulmule. Thanks.
R.K. Deshpande
madhukarrao,saprem namskar. rec. ur beautiful nimantran patrica. all the best wishes for both of u. ok. gazal madhun sangitlelya donhi prakar tevdyach aachuk aahet. kupach aawadle. madan ambulgekar
बढीया..