आयुष्यात कधी असे अनुभव येतात,की आपण चक्रावून जातो. गोंधळतो,निराश होवून जातो. आभाळ दाटून यावं तसं निराशा दाटून येते.जिकडे तिकडे कसं मळभ साचून राहिल्यासारखं वाटतं. मग आपलंच हे शरीर आपलाच हा चेहरा आपल्या नेहमीच्या हालचाली- त्यावरही कशी मरगळ येऊन जाते. इतकंच काय, परिसरातल्या -निसर्गातल्या नेहमीच्या गोष्टी- आभाळ,चंद्र,चांदणे,रात्र हे सगळं सगळंच अपयशी – अपेशी वाटत रहातं,अशूभ वाटत रहातं.. केवळ आपणच नाही तर सगळी सगळीच जण एका दु:खाच्या निराशेच्या लाटेत सापडली आहेत असं होतं…
चांद इक बेवा की चूडी की तरहा टूटा हुवा
हर सितारा, बेसहारा सोच में डूबा हुवा
गम के बादल इक जनाजे की तरहा ठहरे हुए,
हिचकियों के साज पर कहेता है दिल रोता हुवा..
दु:खाचे आभाळ दाटून आल्यावर चंद्राची कोर विधवेच्या फुटलेल्या कांकणासारखी वाटावी-दिसावी, नेहमी चमचमणारे सितारे आता कसे वेगवेगळे-एकटे विचारात बुडून गेल्यासारखे वाटावेत एखादी प्रेतयात्रा थांबावी तसे ते ढग थांबलेले वाटावेत…दु:खाचा केवढा परिणाम होवून गेला आहे हा.. .
हसरत जयपुरी यांनी शब्दबध्द केलेलं हे दु:ख अभिनेता दिलीप कुमार,गायक तलत महमूद आणि संगितकार शंकर जयकिशन यांनी तेवढ्याच उत्कटतेनं मांडलं आहे…जणू एखादा जनाजा चालला आहे…ही सगळी जण शोकमग्न होवून त्यात शामील झालेली आहेत…
श्री मधुकरराव, सप्रेम नमस्कार.तुमचा आजच ब्लोग वाचला.आज काहि आवदला नाहि. तुम्च्याकदुन फ़्रेश वाचन्याचि आवद ज़ालि आहे. द्दुखाचे दोन्गर आवदत नाहि. मदन अम्बुल्गेकर.
ठीक आहे. एक तारखेला वाचावे. शिवाय म.टा.मध्ये दर मंगळवारी सदर चालू झाले आहे. त्याची लिंक पाठवितो आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8023164.cms
धर्मापुरीकर
Barech divasanee aaj *Janibemanzil* vachale. Maza aala.
Dilipkumar aani Talat doghehee ekatra asaleli gaani ashee
dukhane bharaleli asane kramaprapt aahe. Ekek atha
vun
pahavee ase watal