माणसाच्या दिर्घ म्हणविल्या जाणार्या आयुष्यात अनेक टप्प्यांचे प्रवास असतात-
सुख,दु:ख,हसू-आसू,कष्ट-भोग,काय काय. सुखाच्या दिवसात शरीर मन कसं फुलून आलेलं असतं.पण कधी आकाशातून काळे ढग जातात,तेव्हा पठारावर त्यांची सावली पडावी,सगळा परिसर झाकोळून जावा तसं होतं अन संकटांना तोंड देता देता आपलं शरीर मन जणू कोळपून जातं. पण आयुष्य संपलेलं नसतं,प्रवास चालूच असतो. पण संकट-ते येऊन गेलेलं वादळ असं असतं,की आपला चेहरा मोहरा बदलून जातो-
चेहरे की चमक छीन ली हालात ने वर्ना
दो चार बरस में तो बूढापा नही आता
पण हे झालं, कष्टांशी प्रत्यक्ष लढण्यामुळे जी शरीर मनाची झीज होते,त्याबद्दल. गंमत अशी,की त्याच सोसलेल्या-भोगलेल्या दु:खाचं माणूस नंतर भांडवल करतो.कष्टी चेहरा करून वावरतो. सुखाचे दिवस आले, तरी त्याच्या चेहर्यावरचा तो कळंकलेपणा निघून जात नाही. शिवाय तिच सवय एकदा झाली,की माणूस एकांतातसुध्दा वाकड्या चेहर्यानेच रहातो.(-रहातो की काय! एकदा बघायला पाहिजे स्वत:कडे ) पण अशा कष्टी चेहर्याने अंतिमत: नुकसान कुणाचं होणार- आपलंच ना. कुणाला काय देणं घेणं असतं?
वक्त के पास न आंखे है न अहसास न दिल
अपने चेहरे पे कोई दर्द न तहरीर करो ( तहरीर :लिहणे, दर्शविणे)
म्हणूनच ‘सिमाब्’ अकबराबादी हा शायर म्हणतो-
खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना ( कोताह : मर्यादित,सिमित)
माझ्या दु:खाची हकीकत मी स्व्त:च सिमित करून टाकली. गप्प राहिलो. लोकांना माझ्या दु:खाच्या हकिकतीमध्ये भलतीच रूची दिसू लागली.. त्यांना ते ‘भलतंच’ चवदार वाटू लागलं, म्हणून…
Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/
madhukarrao, namaskar. aajche blogvarun mala mazyach swabhavache darshan zaale. doni sher mala tantotant lagu hotat. aa…re…wa…. madan
शुक्रिया ! माझीही तशीच अवस्था आहे. तेव्हा-
…खूब गुजरेगी जो मिल बैठेंगे दिवाने दो !
utkrushta.
Duniyane bahot chaaha afsana bana dena….class ! Saala takrar karatana dekhil hee bhasha kay nazakatine pesh
yete …..
खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना
वा!
दिसणं आणि असणं यातलं अंतर म्हणजे संस्कृती!
दिसण्यामागचं असणं शोधणं हेच लेखकाचं काम असतं नाही का?
वा ! फारच छान !
हा लेख म्हणजे एक ‘अंजन’च.गीता लाठकर यांच्या ओळी-
वाहिलेल्या आसवांचे मोज़णे आता कशाला
संपलेल्या त्या क्षणांचे भोगणॆ आता कशाला
भोगलेले दु:ख,सोसलेले घाव हिही एक लढाईच. आठवणॆ सांगणॆ चेहर्यावर वागवणॆ हे पुन:पुन्हा तेच दु:ख भोगण्याचा मोह होय. पण ऎकणार्या भोगणार्याचे काय..
मन मोकळॆ करणॆ, दु:ख उगाळणॆ, रडगाणॆ गाणॆ यांच्या प्रमाणेच
चिंतनशील गंभीर,शांत,दु:खी ह्या भावनांचे प्रकटीकरण या सर्वांतील सिमारेषा
धूसर व फसव्या असतात. यात भर म्हणजे, दु:ख किंवा दु:खी चेहरा यावर
तत्त्वद्न्यान किंवा गंभीर स्वभाव याचा ‘मेकअप’ चढविता येतो.
तुमचे शब्द, मिश्किल बोलणॆ यातून हा मेकअप सहज धुवून मूळ नैसर्गिक चेहरा दिसू लागतो.
फार सुंदर ! तुमच्या ब्लॉगबद्दल एका शे’र इथे पेश करतो-
खबरदार रहो, वह आलम-मस्त हर वक्त बेखबर
ना जाने कब जूबां से आयत निकल पडे
sadhya chehrach kay,
vaganhi vakad whav,
ase diwas aale…
tumcha blog vachala,
ani…
JAGANYACHE bhan aale…..
asach kahi lihit ja,
ani…
“JEEVAN SUNDAR AHE!”
he aathaun det ja.