नूतन वर्षाच्या शुभेच्छा !
Past is History.Future is Mystery and Present is Gift;that is why we call it as ‘Present’ !
कळतं पण वळत नाही अशी माणसाचे गत असते. सुखाच्या मागे बावळटपणाने आपण लागलेलो, दु:ख आलं की गडबडून जातो आणि अशाच तर्हेची धावपळ आयुष्यभर करणारे आपण : जेव्हा कुणी वडिलधारा, शहाणासुरता माणूस आपल्याला आपल्या अशा बालिशपणाची जाणिव करून देतो, आपल्या वागण्यातली विसंगती दाखवून देतो, तेव्हा आपण थबकतो. लाजतो-बुजतो. विचार करतो. आपल्याला ते पटून जातं.
आपल्या उर्जेचा-शक्तीचा बराचसा हिस्सा हा आपण आपल्या भूतकाळाभोवती तरी विणलेला असतो किंवा भविष्यकाळा कडे जाळं लावण्यात खर्च केला असतो. मग हाती जे लागतं ते बर्याच अंशी दु:ख, निराशा असंच असतं. वर्तमानात- या क्षणात रहायला शिकलं तर आपण आपली अनावश्यक खर्च होणारी शक्ती वाचवू शकतो.
आपल्या क्षणाबद्दल -आत्ताच्या क्षणाबद्दल सावध राहून जगायला संतांनी सांगितलं आहे,पश्चिमेच्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे…पूर्वेच्या कलावंतांनी सांगितलेलं आहे-
तू अगर अपनी हकीकत से खबरदार रहे
न सिया-रोज रहे,फिर न सिया-कार रहे
– डॉ.इक्बाल
आपल्या वर्तमानाशीच तू जर संबंधीत राहिलास,वर्तमानाचं तुला स्पष्ट असं भान असेल,तर मग तुझ्यासाठी अशुभ दिवस रहाणार नाही, कसलंही पाप रहाणार नाही…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
नव-वर्ष शुभेच्छा