मुझे इ न्कार ही कर दे मगर कुछ गुफ्तगू तो कर
तेरा खामोश सा रहना मुझे तकलीफ देता है . ..
गप्प रहाणं,गप्प बसणं आणि मौनात रहाणं, स्तब्ध-शांत,निरवतेत रहाणं या दोनही अवस्थांत फरक आहे का नाही. आहे. सूक्ष्म असा फरक आहे. पण या दोनही अवस्थांना एकच मात्रा लागू आहे,एकच शब्द योजलेला आहे-खामोश.खामोशी…
संतापून जावून आपण एखाद्यावर ओरडतो-खामोश ! समोरचा माणूस गप्प होतो. खामोश होतो. पण खरोखरच का तो खामोश झालेला असतो ?
पण खरोखरची खामोशी ही खरंच खामोशी असते का बरं ? आपण खरंच शांत कधी असतो का- आतून आतून अगदी निरव अशी शांतता खरंच आपल्याला अनुभवता येते का बरं…
खामोश न था दिल भी,ख्वाबीदा न थे हम भी
तनहा तो नही गुजरा, तनहाई का आलम भी ( ख्वाबीदा: – झोपलेला )
तनहाई-एकलेपण असलं की आपण तसं पाहिलं तर शांत असतो,खामोश असतो. पण असं असलं तरी ते खर्या अर्थाने एकलेपण नसतंच.
खामोशीचे कायदे कानून वेगळे असतात. नुसतं शांत रहाणं म्हणजे जसं खामोशी नसते, तसंच इथे कोणताही शोर,आरडा ओरडा ‘गैर कानूनी’असतो. दुसरी बाजू अशी,की आणीबाणीच्या परिस्थीतीत गप्प रहाणं आवश्यक असतं,तिथे आवाज उठविणं चुकीचं,आततायीपणाचं होवू शकतं. एका शायरने म्ह्टलं आहे-
खामोशियोंके दश्त में,क्यूं चिखते हो तूम
कानून सब यहां के सदा के खिलाफ है ( दश्त : जंगल सदा : आवाज,हांक )
…पण दश्त म्हणजे आणीबाणी नाही. जंगलाची शांतता अनुभवायची असेल, तर इथले संकेत इथले नियम पाळायला हवेत. महत्त्वाचा आणि प्राथमिक नियम म्हणजे आपण कुणाला ही साद घालायची नाही, बोलवायचं नाही. आपण अनुभवायची असते ती शांततेची वनराई….
पण या खामोशीचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या परीने लावीत असतात. ‘जिगर’मुरादाबादी म्हणतो-
उसे सैय्याद ने कुछ,गुल ने कुछ,बुलबुल ने कुछ समझा
चमन में कितनी मा’नीखेज थी, इक खामोशी मेरी
( सैय्याद : शिकारी मा’नीखेज : अर्थपूर्ण )
खामोशीने घेरलेल्या माणसाचं निकटचं माणूस त्याची खामोशी पाहून अस्वस्थतेनं घेरून जातं. जवळच्या माणसाचा गप्पपणा पाहून त्याला करमत नाही,राहून राहून मनात निरनिराळे विचार येत रहातात ; आणि मग न रहावून त्याला सांगावं वाटतं,’मुस्कुराओ के जी नही लगता..’ खरंच, खामोश मुस्कुराहट किती बोलकी असते…आणि ते बोलणंसुध्दा पहात रहावं वाटणारं.
‘कंगन’ मध्ये निरूपा रॉय हीच तर विनंती करते आहे, गीतकार राजेंन्द कृष्ण यांच्या शब्दांतून संगीतकार चित्रगुप्तच्या चालीतून, …अशोक कुमारला
: अर्थपूर्ण )
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
walekum salaam!!!
wah wah subhan allah…