वेदनेच्या भयाने विव्हळणारा माणूस पुढे भयाच्या वेदनेने विव्हळत रहातो असं कुण्या देशातल्या कुण्या भाषेतल्या माणसाने कुण्या काळात लिहून ठेवलेलं-अन् त्याचे प्रतिध्वनि माझ्या मनात उमटत जातात अन मी तपासाला लागतो- मी कशामुळे त्रस्त आहे…द:खाच्या काळजीने का काळजीच्या दु:खाने… एखादा मनोरूग्ण बसल्या बसल्याच थरथर कापावा,कण्हावा-कुंथावा तसं माझं मन दैनंदिन व्यवहारांच्या वर्दळीत उगीचच बाजूल होतं, उगीचच कण्हत रहातं.खरं म्हणजे, आत्ता-आत्ता काही घाबरण्यासारखं नसतं,काळजीचं नसतं.सगळं एका परीने आलबेल असतं.पण-
न राहे सख्त होती है,न मंजिल दूर होती है
मगर अहसासे-नाकामी,थका देता है राही को
( अहसासे-नाकामी : निराशेची भावना,पराभवाची जाणिव)
समस्या तेवढ्या अवघड नसतात.संकटं तेवढी घेरलेली नसतात.धैर्याने-धीराने तोंड दिलं, तर त्यातून सहज बाहेर पडूही शकतो…पण पडलो नाही बाहेर तर? …हा प्रश्न पाऊलच उचलू देत नाही ना. उत्साहाच्या ‘रिडींग’चा काटा झिरोच्या पुढे हटायलाच तयार नसतो की.
निराशेच्या,पराभवाच्या फाजील विचारांत गुंतून पडलं,की असं होतं. वाटतं,की शक्यच नाही,सगळीकडे अंधारच आहे.
पण हे सगळे मनाचेच खेळ. मन तशा विचारानं भारून गेलं,की शरीरावर मळभ साचणार.
आणि याच मनावर उत्साहाचा अंमल झाला-प्रकाशाच्या विचारांचा असर झाला,की ढगाची सावली जावून सगळ्या परिसरावर सोनेरी उन पडावं तसं शरीर मोहरून उठतं…
कुछ कफस की तिलीयों से छन रहा है नूर सा
कुछ फिजां,कुछ ताकते-परवाज की बातें करो
( कफस : सापळा,पिंजरा,देह.. नूर :प्रकाश. ताकते-परवाज : उड्डानाची इच्छा-शक्ती )
आणि खरंच,प्रकाशाचे स्वागत केले,की शरीर मनात तो उमटतोच उमटतो :
दिल रोशन,तेरा मन रोशन तो जहां ss रोशन !
Please visit another blog –http://hasanyachaaakar.wordpress.com
It was very nice to read in fresh Morning. Ha form aata tumhala sapadala ahe. DIWALI SHUBH CHINTAN tumha sarvansathi. Ashay 1-2 diwasat milel. Tumache article
click nakki hoyeel, pan mala khupach lahan watale..
Jaanibe Manzil maza aanate aahe…