मुझको गुस्सा दिखाया जाता है
तबस्सुम को चबाया जाता है
प्रेयसीला प्रेयसीपण बहाल व्हायच्या आधीची अवस्था मोठी विचित्र असते. नायकाचा ,प्रियकर पदाचा ‘शपथविधी’झालेला असतो. पण ती तयार नसते. आणि तिला राजी करून घ्यायचा-प्रियकराचा तो कठीण काळ ! न पहाणं,प्रतिसाद देणं, यानंतर मग उतावीळ झालेल्या त्या नायकावर राग व्यक्त करणं,चिडणं आणि रागावणं असं तिच्याकडून होत जातं अन त्याला त्या सगळ्याची कमालीची मजा येत जाते.
मिर्झा गालिबचा एक शे’र आहे-
कितने शिरीन है तेरे लब के रकिब
गालियां खा के बे मजा न हुवा
शिरीन म्हणजे गोड आणि रकिब म्हणजे दुश्मन.शत्रू. इथे तिला-ती त्रास देते आहे,रागावते आहे म्हणून रकिब म्हटलेलं आहे.
हिदी चित्रपटात तर सरसकट म्हणता येईल असे प्रसंग तर हमखास असतात. नयिकेची ओळख,तिच्याशी लगट करताना होणारी चकमक आणि तिचा राग-संताप मोठा पहाण्यासारखा असतो. आणि सुंदर असलेली नायिका जेव्हा रागात येते- डोळे वटारते,ओठ मुडपते तेव्हा ती केवढी सुंदर दिसते ! तिच्या रागाचा उलटा परिणाम होवून नायकाला तिची चक्क भुरळ पडून जाते.
‘दिल ही तो है’मध्ये मुकेशने गायलेल्या गाण्यात या रागाच्या सौंदर्याचं किती छान वर्णन केलंय पहा-
गुस्से में जो निखरा है,उस हुस्न का क्या कहना
कुछ देर अभी हमसे, तुम यूं ही खफा रहना
या गाण्याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी. गद्यप्राय रचना हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य. अशा गाण्यांना चाल लावणं अत्यंत कसरतीचं असतं, पण संगीतकार रोशननं साहिरच्या अशा अनेक अवघड रचनांना मोहक चाली देवून त्या वाकवून दाखविल्या. याच गाण्यातल्या शेवटच्या ओळीतली कल्पना किती सुरेख आहे पहा-
पहले भी हसीं थीं तूम,लेकिन ये हकिकत है,
वो हुस्न मुसिबत था,ये हुस्न कयामत है
रागातलं हे सुंदरपण आणि कुणाचं- नूतनचं. वा! ‘दिल्ली का ठग’ मध्ये नूतनची छेडछाड किशोर कुमार करतो
आणि त्यामुळे नूतन तर वैतागून जात असते…आपल्याला मोह पडत असतो.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
Gussaa ashach vyaktivaracha chchaan sukh deto ji vyakti aplyavarcha [latkaa] gussaa pragat karate.
Tya vyakteela thodi nisargdatta vinod budhdhi milaleli asate.
Baaki tumache lekhan chchaan v vachneey ahe.
नमस्कार !
गालीबच्या ग़ज़लेचा खरा अर्थ –
आपल्या प्रियतमेकडून कितीही कटू शब्द ऐकायला लागले तर आपण काय करतो ? खरंतर आपण प्रेमात पडल्यावर ते शब्द आपल्याला कडवट वाटतच नाहीत.
ग़ालीब म्हणतो –
कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब
गालिया खाके बेमज़ा ना हुआ
किती मधाळ आणि गोड आहेत तुझे हे ओठ, त्यातून येणार्या अपशब्दामुळे आम्हाला आजिबात राग येत नाही. आमचे जाउदेत ! आमचे तर तुझ्यावर प्रेम आहे. पाहिजे तर हे तू
तुझ्या भोवती जमा झालेल्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही विचारू शकतेस ! त्यांचीही तीच गत आहे. ( रकीब – प्रेमातील प्र्सतिस्पर्धी)
पूर्ण अर्थासाठी माझा http://www.jayants-blog.blogspot.com वाचावा ही विनंती.
जयंत कुलकर्णी.
जयंत चा ब्लोग वाचला का ?
मला तुम्ही लावलेला अर्थच योग्य वाटतोय