परस्परांवरचा विश्वास कमी झाला, की पहिलं नुकसान होतं,ते निर्मळ हसू-मोकळी थट्टा निघून जाण्याचं. चेहर्यावर सदा संशय, तणाव,राग मुक्कामाला येतात. परस्परांचा द्वेष व्हायला सुरूवात होते.अशात कुणी थट्टाही केली,तर ऎकणारा प्रतिसाद द्यायच्या ऎवजी शंका घ्यायला सुरूवात करतो- याने असं का म्हटलं? याचा हेतू आपली टिंगल करण्याचा आहे, की काय वगैरे… हसणं हरवून बसलेला समाज कलहाकडे वळतो. कटकटी-समस्यांनी घेरून जातो. एखाद्या कलावंताला या सामाजीक परिस्थितीची जाणिव होते;त्याला त्याचं महत्त्व कळतं, तो निदान करतो-
लोग तारीक के औराक में कल ढूंढेंगे
कौन से दौर में इन्सा को हसी आई थी
( माणूस कोणत्या कालावधीत हसला असावा बरं, याचा शोध उद्या इतिहासांची पानं ढूंडाळून घ्यावा लागेल !)
खरंच आज जर माणूस हसण्यापेक्षा विनोद कोण केला आहे,त्याचा हेतू काय तो कोणत्य समाजाचा आहे,त्यातून आपल्या धर्माला-आपल्या नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसला काय हेच जर शोधू लागला, तर हसणं कुठे राहिल? द्वेषाने कडू कडू झालेली माणसं आज दिसतात ते याच भावनांच्या प्रभावामुळे. म्हणून आज गरज आहे हसण्याची. निर्मळ होवून रहाण्याची. पण या हसण्याच्या नादाला लागून थोडा धोका होवू शकतो,त्यापासून आपण सांभाळायला पाहिजे-
हसो,के आज हसी की बहूत जरूरत है
मगर किसी के लबों से न छीन कर लावो….
दुसर्याला दु:ख देवून मिळविलेलं हसू विषासारखं असतं.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
daha tarakhecha blog garaj wachoon aathavalele don sher
woh dosti to khair ab nasibe dushmana hui
woh chhoti chhoti ranjishon ka lutf bhi chala gaya
berukhi isase badi aur bhala kya hogi
ek muddat se hame usane sataya bhi nahi