क़ॅनडा येथे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्हायचे,त्या प्रदर्शनातले हे एक परकीय व्य़ंगचित्र. साध्या रेषांनी इथे एक माणसाचा आकार तयार झालेला आहे. हा माणूस धावतो आहे. याच आकाराच्या मध्ये आणखी एक आकार आहे, तो माणसाचाच आहे, तोही धावतोच आहे-मात्र उलट्या दिशेने धावतो आहे. त्याच्यातही एक माणूस-धावणारा;पण तो सुलट्या दिशेने…
शरीराच्या आकाराकडे थोडं थांबून ( म्हणजे आपण !) पाहिलं,की लक्षात येतं,हा एकच माणूस आहे. शरीराने एका दिशेने,तर मनाने दुसर्या दिशेने धावणारा. परस्पर विरोधी विचार-भावनांचा कल्लोळ बाळगून अस्थीर झालेला माणूस…आपण सर्वजण.
म्हटलं तर ही समस्या,म्हटलं तर ही प्रकृती. या स्थितीकडे गमतीनेही पहाता येतं,गांभीर्यानेही. डॉ.इक्बाल आणि मिर्झा गालिब;उर्दू शायरीतले हे महान कवी. माणसाच्या मनतली चलबिचल अस्वथता,याचा शोध घेवून अर्थ लावणारे डॉ.इक्बाल,तर ती स्थिती स्विकारून त्याकडे गमतीने पहाणारा गालिब.
डॉ.इक्बाल म्हणतात
ढूंडता फिरता हूं मै ऎ ‘इक्बाल’अपने आपको
आप ही गोया मुसाफीर,आप ही मंजील हूं मै ( गोया : जसं काही…)
… आणि मिर्झा गालिब चा शे’र आहे-
खुदाया ! जज्बा-ए-दिल की मगर त’आसिर उलटी है
के जितना खेंचता हूं,और खिंचता जाए है मुझसे
( जज्बाए दिल :ह्रदयाचे आकर्षण,प्रेम तासीर : गुणधर्म, प्रभाव )
…काय सांगावी या प्रेमाची गंमत ! सगळंच उलटं होतं आहे, इथे. तिच्यापासून दूर जाण्याचा मी जेवढा प्रयत्न करतो आहे, तेवढाच ओढ्ल्या चाललो आहे की तिच्या कडे !
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
मस्त!
व्यंगचित्र आणि शेर तंतोतंत जुळ्ले आहेत. अलिकडे एक गाणे फर गाजले त्याची आठवण होते. मेरे मन ये बतादेतू किसओर चला है तू……. लेख चांगला आहे.