एखाद्या कलावंताची निर्मिती त्याने(अन त्यानेच )मांडली तर त्याच्या सांगण्या-बोलण्या-वागण्याला एक सूर येतो;त्याला हवा असणारा.त्याला अभिप्रेत असणारा सूर. पण त्याची निर्मिती इतरांकडून अभिव्यक्त झाली तर…. वानरीचे मूल तिच्या हातून दुसरी वानरी हिसकावून घेते;त्याचा लाड-प्यार करतानाच तिसरी वानरी ते मूल तिच्याकडून हिसकावून घेते-गोंजारण्यासाठी, कुरवाळण्यासाठी.अशा तर्हेने वानरीचे ते मूल झाडावरच्या अनेक वानरींकडून प्रेमाने,कौतूकाने हाताळल्या जातं.कुरवाळल्या जातं.
कलावंताची निर्मिती ही अशीच. विशेषत: त्याची गीत रचना. शब्दांमध्ये जादू बांधून तो कलावंत निघून गेलेला असतो आणि वेगवेगळ्या पिढीतला माणूस, स्त्री, गायक, संगीतकार, वादक असे कितीतरी जण ते शब्द घेवून मिरवीत असतात. आपल्या भावना, आपली सुख दु:खं,त्या शब्दांच्या आधारे जुळवून घेत रहात असतात. सुख दु:खाचे स्वरूप तेच असले तरी, पिढी निहाय, वयनिहाय्,स्वभावनिहाय त्या सुख दु:खाची अभिव्यक्ती विविध तर्हेने होत जाते आणि आपण जरा बाजूला उभं राहून पाहिलं,तर या मिरवणूकीचा वेगळा असा अनुभव आपल्याला लाभतो.
मोठ्या कवींच्या रचना हे त्याचं ठळक उदाहरण. मिर्जा गालिबची एक गजल आहे-
आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक
(आह… एक इच्छा-साधी उसाशाएवढी;पण ती ‘असरदार’होण्यासाठी-परिणामकारक होण्यासाठी एक आयुष्य खर्ची घालावं लागतं,असं माझं नशीब;मग तुला वश करून घेण्यासाठी-तेवढा कालावधी माझ्या आयुष्यात कुठे आहे…शिवाय-
हम ने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक
(मान्य आहे,तू मला नाही म्हणणार नाहीस;पण माझ्या प्रेमाची जाणिव तुला होईपर्यंत मी खलास होवून जाईल,त्याचं काय !)
आता गंमत पहा, ही गजल ‘मिर्जा गालिब’या मालिकेत जगजीत सिंहने कशी पेश केली आहे,आणि हिच गजल ‘मिर्जा गालिब’या चित्रपटात( वर्ष: ) सुरैय्याने कोणत्या ढंगात पेश केली आहे. मग गमतीचा प्रश्न असा पडतो,की गालिब आज असता,तर तो कुणाच्या बाजूने राहिला असता-विशेषत: या शे’रच्या संदर्भात-
गमे-हस्ती का ‘असद’,किससे हो जुज मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है सहर होने तक
( दु:खाच्या आयुष्याला इलाज आहे तो केवळ मृत्यूचाच. (त्या मृत्यूची) सकाळ होईपर्यंत शमा वेगवेगळ्या रंगात-ढंगात जळत रहाते-नाही,त्याशिवाय तिला दुसरा उपाय तरी कुठे असतो..)
जगजीत सिंहचा तो गंभीर स्वर, गांभिर्याने,सावकाश गायलेली ही गजल आणि सिनेमातली ती तवायफ-सुरैय्या;तिने याच गजलला दिलेला खेळीमेळीचा, समजूतीचा फुलोरा… शब्द तेच,आशय तोच; पण अभिव्यक्तीच्या तर्हाा वेगळ्या,
रंग वेगळे.( अर्थात इथे नसरूद्दीन शहा,सुरैय्या यांच्या अभिनयाचा-चित्रीकरणाचा मुद्दा विचारात घेतला नाही,ती अभिव्यक्ती हा आणखी स्वतंत्र आणि मह्त्त्वाचा भाग आहे)
जाता जाता : ‘लोलक’ हा शब्द ‘लोला’पासून तयार झाला असावा. ‘लोलक’म्हणजे, दागिण्यातला लोंबता मणी;आणि ‘लोला’म्हणजे, घंटेमधला लंबक. भक्ताच्या सुख दु:खाची तीव्र-कोमल अवस्था,मंदिरात प्रवेश करताना, त्याच्या हातून-घंटेच्या नादस्वरातून जाहीर होत असते.
एखादी गजल, गाणारा-सांगणारा-अभिव्यक्त करणारा,आपल्या तर्हे’ने जेव्हा सादर करतो, तेव्हा-गजल तीच असते पण- त्या गजलमधले ध्वनी तसतशा तर्हेने उमटत जातात- आपल्या मनाच्या गाभार्यात…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
अभिव्यक्तीचे लोलक हे शिर्षक या लेखाला दिले ते फार पटले ही अवस्था प्रामुख्याने लोकगित, भजन, व ज्या गितांचे कवि अज्ञात असतात त्यात फार जाणवते
It is truely said that…..
Hai aur bhi duniya mein sukhanwar bahot achche
Kahet hain ke Ghalib ka andaze bayan aur
It seems from ur article that the presenter is also gives different color to the presentation. It is the fact about mst of the art forms. I am realy impressed by the title ” Abhivyaktiche Lolak ”. Thus I hit the bell ” Thannn ”
Rajiv Deshpande.
या ग़ज़लांच्या संदर्भात मलाही असा प्रश्न पडत आलाय. तसंच ‘यह न थी हमारी किस्मत’ बाबतही वाटतं. चित्रपटातली चाल फास्ट, लहरती आहे, ते काव्याच्या दृष्टीने विसंगत वाटते. तुमचं जानिब-ए मंझिल छान चाललंय.
तुमच्या या लेखाने माझे एक शंकासमाधान झाले. छान लेख. धन्यवाद.