बियांबा,दश्त,जंगल… उर्दू शायरीत वावरणारे हे शब्द .आणि शब्दांची संगत घेवून जंगलाची सततची ओढ मनात बाळगणारा मिर्जा गालिब. संवेदनशील माणसाला अगदी दाट अशा जंगलात स्वत:ला हरवून टाकण्यात कोणतं बरं …काय बरं मिळत असावं… सुख,समाधान,आनंद वगैरे शब्द तिथे लागू होत नसतात. हे शब्द व्यवहारातले,दैनंदिन अनुभवातले-मतलब जाहीर करणारे शब्द आहेत. जंगलाची ओढ असणार्या माणसाला गूढ असं स्वत:बद्द्ल वाटत असतं, ते पडताळून पहाण्यासाठी तर तो तिथे रमत नसावा. नाही… काहीच सांगणं-बोलणं नको. डोहात शिरत जाण्याची ती एक अनुभुती असते,बस.
पण घर सोडून आलेला माणूस-जबाबदारी,संसाराकडे पाठ करून आलेला माणूस… त्याला जंगलात वावरताना कधी अस्वस्थ वाटतं. तो तसा मुक्त थोडाच असतो,योग्यासारखा… जंगलातलं नि:शब्द वातावरण बघून माणसाला परत घराची आठवण व्हावी,हा कसा पेंच आहे पहा-
कोई विरानी-सी-विरानी है
दश्त को देख के घर याद आया
या मिर्जा गालिबचा आपल्याला सतत हेवा वाटतो, ते त्याच्या विवंचनेच्या आयुष्यात त्याने जोपासलेल्या तल्लख गमतीदार-वृत्तीचा. (नाहीतर आपण विवंचनामुळे वैतागून गेलेलो असतो- गोमाशांमुळे हैरान होणार्या माकडासारखे. आपल्याला हसण्यासाठी आधी सुखाची गरज असते, मगच आपण हसायला तयार होतो…) जंगलाची सैर करून गालिब एकदा घरी परतला, आणि त्याने पाहिले-घराच्या भिंतीवर,दारांवर पावसामुळे ठिकठिकाणी गवत उगवलेलं ! गालिबला त्याचीही गंमत वाटते-
उग रहा है, दरो-दिवार से सब्जा ‘गालिब’,
हम बियाबां मे है,और घर में बहार आई है
हाच शायर जेव्हा मनातली घालमेल-अस्वस्थता याचा विचार करतो, तेव्हा मनाच्या तशा स्थितीची अपरिहार्यता त्याला पटते. तो सांगतो,
घर हमारा जो न रोते भी तो विरां होता
बहर अगर बहर न होता तो बियाबां होता ( बहर : समुद्र. )
( गालिबला कुणी विचारलं असावं : अरे बाबा तू सतत का रडतोस, बघ रडून रडून तू घराची काय दशा करून टाकली आहेस ! तेव्हा गालिबने हे उत्तर दिलं असावं.)
पण म्हणतात ना,घराला माणसामुळेच घ्ररपण येत असतं. अगदी तसंच जंगलात सतत वारणार्या माणसामुळे जंगलातसुध्दा एकप्रकारचा जीव आलेला असतो. माणसाला जंगल जवळ घेतं,त्याला आधार देतं हे जसं खरं,तसंच माणसामुळे त्या अरण्यालासुध्दा एक प्रकारचा विरंगुळा असतो. म्हणूनच लैला,लैला करीत जंगलात भटकणारा मजनू जेव्हा निघून जातो,तेंव्हा जंगलसुध्दा उदास होवून जातं…
हर इक मकां को है, मकीं से शरफ ‘असद’ ( शरफ : प्रतिष्ठा मकीं : घरात रहाणारा )
मजनू जो मर गया,जंगल उदास है..
लता मंगेशकरने गालिबची एक गजल गाताना, ‘कोई विरानी सी विरानी है..’ ही ओळ एवढ्या आर्ततेनं म्हटलेली आहे, की ‘बियाबानी’ ( जंगलातली भटकंती) करण्याची मनाला ओढ लागते…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
आपल्याला हसण्यासाठी आधी सुखाची गरज असते, मगच आपण हसायला तयार होतो…
छान!!
Aaj 7 July 2010. Ratri neet zope naahi ali. Pahate 4 wajta uthoon Janib e manzil cha pravas karato ahe. Lata chi ‘dil jigar……’ hi ghazal aikato ahe tenva malahi asach watale……..
कोई विरानी-सी-विरानी है
दश्त को देख के घर याद आया
Haal mukkam Punyacha ahe.
Rajiv Deshpande
…khub gujaregi jo mil baithenge diwane do… dharmapurikar
I am from Desaiganj Warsa, near dharampuri dist. Gadchiroli.If you are from that village of Dharampuri, pl. get in touch with me.I know Marathi but I can not type in Marathi.
No Sir,I am from Nanded District.