‘आंसू तूम अब कभी न बहना’असं लतानं गायलेलं फार जुनं फिल्मी गीत आहे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अभिनयाला जादा कष्ट न होवू देता काम करणारे हे डोळ्यातले दवबिंदू सिनेमात फार फार उपयोगाची ‘प्रॉपर्टी’ असते. ‘ये आंसू मेरे दिल की जुबान है’,’आंसू भरी है ये जीवन की राहे’, ‘भर भर आयी अखिंया’, अशी कितीतरी गाणी प्रसिध्द आहेत.
डोळ्यांच्या पापण्याआड असणार्या या ओलसर संवेदना केवढ्या आतूर,केवढ्या कार्यक्षम असतात;आणि गजब म्हणजे, आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. खोल जिव्हारी अशी जखम बुजलेली असते,ती बुजून गेलेली आहे असं आपण बजावीतही असतो, पण रस्त्यात अचानक-अनाहूतपणे परिचीत माणूस नजरेला यावं,तशी ती आठवण उमटते आणि लागलीच डोळ्यांची झरझर सुरू होते…
आया ही था खयाल, के आंखे छलक पडी
आंसू किसी की याद के कितने करीब है.
मीना कुमारी. सौंदर्यवती,अभिनेत्री आणि शायरा. तिच्या प्रत्येक शे’रमधून एकप्रकारची झिरपणारी भावना जाणवत असते.
काम आते है, ना आ सकते है बेजां अलफाज
तर्जूमा दर्द की खामोश नजर होती है
या शे’रमध्ये दु:ख व्यक्त करण्यासाठी खामोश नजर हाच उपाय असतो,असं ती म्हणते. एका शे’रमध्ये ती म्हणते,डोळ्यांतून ओघळणार्या थेंबाची जाणिव कुणी करून घेतली, तरच तो थेंब-त्याला अश्रूचं मोल येतं. दखल न घेतल्या गेलेलं दु:ख… या दु:खाला खरंच काही मोल असतं का…विचारपूस न होणं,त्या दु:खाला आश्रय न मिळणं हा दु:खाचा खरा दाहक भाग असतो-
जिंदगी आंख से टपका हुवा बेरंग कतरा
तेरे दामन की पनाह पाता तो आंसू होता
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
मस्त!!
Tuza Blog baghitala. Thoda chalala. Gadya, eevhada barik kalal madhya hushar hota aata shahanahi zalay.