‘नातेसंबंधातली शुगर’या टिप्पणीवर ज्या प्रतिक्रिया आल्या,त्या सगळ्यांचं मला अप्रूप आहे. केवढा धीर वाटतो आहे.
निमित्तावाचूनच्या बंधुत्त्वाची आस अधून मधून लागते.( हे अधूनमधून केव्हा असतं-जेव्हा मनातले हेतू निर्मळ झालेले असतात. हे हेतू अधूनमधूनच का निर्मळ होतात- कारण शंभर टक्के आरोग्य संपन्न माणूस मिळणं जसं कठीण; तसं कायम निर्मळपण असणं-माझ्यापुरतं तरी-कठीणच. आणि ना घ देशपांडे यांच्या ओळी-
अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले,ते प्रेम आता आटले
ह्यासुध्दा अनुभुतीच्याच ओळी आहेत की. म्हणजे, शुगर होत असतेच. मैत्रीत जेव्हा जाणिवपूर्वक व्यवहार ठेवलेले असतात,ती मैत्री सरली, तर दोघांनाही त्याचं सुतक रहात नाही;मात्र मैत्रीत व्यवहार नसताना मैत्री का आटून जात असावी, हाच प्रश्न आहे.
पण गंमत अशी, की ज्या अर्थी मैत्री आटून गेली,त्या अर्थी त्या मैत्रीत व्यवहार होते हे स्पष्टच असतं का… हे व्यवहार म्हणजे, मी ‘तुझा-तू माझा’,’तू चांगला-मी छान’ अशा प्रकारचे अपेक्षा-व्यवहार. ( ही मैत्री म्हणजे, केवळ मित्रांतलीच मैत्री नसून सगळ्या नाते संबंधाला हिशोबात घेवून मी सांगतो आहे. लहानपणी एकाच ताटात जेवणारे भाऊ मोठेपणात एकमेकांच्या जेवण-पध्दती,आवडी-निवडीवर टीका-टिप्पणी करतात हे शुगरचंच लक्षण,नाही का… अर्थात मोठेपणातही एकाच ताटात जेवावं अशी बालिश अपेक्षा इथे नाहीच.)
गावाकडच्या घरी जावून आता राहणं शक्य नसतं;पण ते घर आठवलं- कधी पाहून घेतलं तर मोठ्या उत्कट भावना दाटून येतात. चलबिचल होते. ती तेवढी चलबिचल जशी मनात येत-जात रहाते, तीच चलबिचल न उरलेल्या मैत्रीबद्दल राहिली, तर शुगर नियंत्रणात राहिल असे वाटते.
शिवाय, एकमेकांबद्द्ल आशा-अपेक्षा, उश्रमा-सुश्रूशा, हे सगळंच ठेवायला काय हरकत आहे… त्याच्यामुळेच का होईना, संबंध तर आबाधीत राहातील ना ! अर्थात महत्त्वाची गोष्ट अशी, की भान ठेवून-तारतम्य ठेवून एकमेकांचा राग लोभ ठेवला, तर तोही एक इलाजच होईल…नाही का.
एखाद्या पाटाचं पाणी वळवून आपला वाफा भिजवून घ्यावा, तसं गालिबनं आपल्या प्रेयसीसाठी जे म्हटलं आहे, ते आपल्यासाठी तात्पुरतं वळवून घ्यायला काय हरकत आहे-
कत’अ किजे न त’अल्लुक हम से ( कत’अ : कापणे, तुकडे करणे त’अल्लुक :संबंध,संपर्क )
कुछ नही है तो, अदावत ही सही ( अदावत : वैर )
कत’अ किजे न त’अल्लुक हम से
कुछ नही है तो, अदावत ही सही
वा! हा शेर खूप आवडला.
वैरात देखील प्रेम असतंच.
मी तर नेहमी म्हणते, माझ्या जवळच्यांशीच मी भांडते, बाकी ये्णार्या-जाणार्यांशी मला काय देणं घेणं?
निखळ मैत्रीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट मला वाटते हेतूंबद्दलची स्प्ष्टता, त्याबद्दल शंका नसावी.
natyat guntali asha
ashet guntale nate
swarthacha dhaga tutata
hi mal bhanguni jate
je tutun jate sahji
tya kase mhanave nate
je adhich aste kacche
bhangun tech tar jate