माणसाला खरंच काय हवं असतं- एकांत का सहवास ? या प्रश्नाचं सरळ -स्वतंत्र असं उत्तर नाही. उत्तर आहे; ते संदर्भासहित द्यावं लागेल. ते उत्तर असं, की माणूस सहवासात असेल तर त्याला एकांत हवा असतो. ..एकांतात असेल,तर त्याला हवा असतो सहवास.
गमतीच्या मन:स्थितीत एकदा एक शे’र वाचण्यात आला. तो गंभीर होता- चूक माझी होती, मी गमतीत होतो. शे’र वाचला –
घर में रहूं,तो दौडके तनहाईयां डसे
निकलूं शहर में तो शनासाईयां डसे ( शनासाई : ओळख.परिचय )
– ‘ नाजिश’ प्रतापगढी
अन् वाटलं, अरे ! उधारी-उसनवारीची सवय असलेल्या माणसाच्या या भावना,की काय !
मात्र एकलेपणाची जाणिव जेव्हा होते, अस्वस्थ व्हायला होतं , तेव्हा एखादा शे’र काय म्हणतो आहे, ते ऎकायला येतं.-
कभी सन्नाटा भी डस लेता है नागन की तरहा
बच के हंगामों से तनहाई में बैठा न करो ( हंगामा : कोलाहल, गर्दी, जमाव )
कारण, गंमत पहा, माणूस असतो एकला- पण त्याच्या मनात एवढा कोलाहल दाटून असतो कधी,की त्याला पळून यावं वाटतं, ‘बाहेरच्या’गर्दीत-
मुझको मेरी आवाज सुनाई नही देती
कैसा ये मेरे जिस्म में इक शोर बसा है
गर्दीत आपण पहातो, पुष्कळदा माणूस स्वत:शीच बोलत बोलत चालत रहातो. हा तोच असावा का…
एक परकीय व्यंगचित्र पहा :
चित्रात, पहिल्या भागात बेटावरचा माणूस अगतीक होवून बसलेला आहे-एकटा. गर्दी,कोलाहलाची तीव्र ओढ त्याला सतावते आहे. आणि दुसर्या भागात कोलाहलात सापडलेला माणूस अगतीक होवून दूर कुठं बेटावर एकटं जावून बसावं या विचारात आहे. ( तोच आहे की काय ! )
आता सांगा बरं, काय हवं असतं माणसाला…
बाग में लगता नही, सेहरा से घबराता है दिल
अब कहां ले के जाए ऐसे दिवाने को हम
टीप: माझ्या दुसर्य़ा ब्लॉगला भेट द्या इथे – http://hasanyachaaakar.wordpress.com/
मुझको मेरी आवाज सुनाई नही देती
कैसा ये मेरे जिस्म में इक शोर बसा
मनात कोलाहल दाटला आहे,हे खरे,पण त्यातून बाहेरच्या गर्दीत पळून यावेसे वाटते असा अर्थ काढणे थोडे अतीव्याप्त वाटते. दु:ख हे आहे की आपला खरा आवाजच आपल्याला ऐकू येत नाहीय.
व्यंगचित्र छान आहे. चित्राचा दुसरा भाग आधी असता तर आणखी मजा आली असती.
छान! सगळेच शेर एकदम एकास एक सव्वाशेर आहेत.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे, आपापल्या मनस्थितीप्रमाणे वातावरणाप्रमाने आपल्याला त्या शब्दांतल्या वेगवेगळ्या आभा दिसतात….
मलासुद्धा याचबद्दल सांगायचंय….
“मुझको मेरी आवाज सुनाई नही देती
कैसा ये मेरे जिस्म में इक शोर बसा ”
खरंच…. वरती विजय म्हणाले तसं यात एक प्रश्न नाही विचारला किंवा तक्रार ही नाहिये की आता अगदी बाहेरच्या गर्दीत पळून यावेसे वाटते…
असं काही मनात काहूर माजलंय की आपली नेहमीची मतं…. नेहमीची विवेकबुद्धी किंवा नेहमीचे आपणच कुठे हरवलोय असं होवून जातंय…. असाच अर्थ मलाही वाटतोय…. सहसा सगळ्या अशा शेरांत तक्रार नसते, पण फक्त अभिव्यक्ती जी एकदम सुंदरपणे मांडलेली असते.
छान!
दरवेळी एकांत नको वाटेल, असं नाही. एकांतात शोध लावले की माणसाला ते लोकांना येऊन सांगावेसे वाटतात, असं असेल का? पण तोवर एकांत हवाहवासाच असतो.
एकटा बरा आहे
येथ मी खरा आहे
संगती नको कोणी
कोवळा झरा आहे.
माझ्या समजुतीप्रमाणे
एकाकीपणा : मनाविरुद्ध लादले गेलेले निरुपायी एकटेपण (लोनलीनेस)
एकांत : स्वतःहून स्वीकारलेले एकटॆपण (सॉलिट्यूड). ज्यात आपली आपल्याला ओळख पटणे, खरा आवाज ऐकू येणे वगैरे घडेल.
शेर-विवेचनात जर एकांत या शब्दाऐवजी एकाकीपणा/एकलेपणा हा शब्द वापरला तर……
Conversation enriches the understanding but solitude is the school of genius —
Ralph Waldo Emerson
… एकलेपण हा शब्द खरंच योग्य आहे. शायरला एकलेपणच अभिप्रेत असावे…
सुंदर!!
Chhan.
Apalya Nandedla Yadavsut navache ek kavi hote,
tyanchya kavitechya oli athwalya.
Ekantwas de shant prabho santancha
sahawas nako ya dukkhpoorn jagatacha.
वा !…
एकांतवास दे शांत प्रभो संतांचा
सहवास नको या द:खपूर्ण जगताचा
गंमत अशी,की माणसाला एकांताची ओढ लागते ती सहवासाच्या कंटाळ्यातून
…आणि सहवासाची गरज वाटते, ती एकांताच्या भीतीतून ?
‘ekant’anubhavne,tyachi godi chakhane,he ‘ekakipan’ talnyasathi aavashyak!!..enjoy company of ‘self’!!
[…] दिवाना ! May 2010 9 comments […]