खामोश न था दिल भी, ख्वाबिदा न थे हम भी ( ख्वाबिदा : झोपलेला )
तनहा तो नही गुजरा, तनहाई का आलम .. .
– ‘ शमीम ‘ क्ररहानी.
‘लम्हे’ या टिपणावर विद्याने प्रतिक्रीया दिली, ती अशी : अबोलपणे जाणारे क्षण रिकामेच असतात असे नाही..
बोलके क्षण आणि अबोल क्षण याचा विचार करताना सहसा आपण ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ तर्हेने विचार करतो: बोलके क्षण म्हणजे बडबड आणि अबोल क्षण म्हणजे कोंडून ठेवलेली बडबड ( आणखी एक उथळ कल्पना म्हणजे, बोलणारा तो सुखी; अबोल तो दु :खी ) असं काही खरंच नसतं. किंवा असं म्हणता येईल,की नेहमीच हे खरं असतं असं नाही.
कित्येकदा संध्याकाळी आपण एकटे असतो. त्यावेळी अनाहूतपणे आपल्याला एकलेपण जाणवत रहातं. या एकलेपणात कुणाबद्द्ल शिकायत नसते;ना हुरूप. एक प्रकारच्या निवांतपणाची पोकळी मनात तयार झालेली असते. आपण बाहेर पहात नसतो, बोलत नसतो,शांत असतो. अन् मनातल्या त्या निवांत पोकळीत डोकावून पाहिलं तर तिथेही काहीच तर नसतं की. सगळेच क्षण जणू विरघळून गेलेले असतात. नितळ पाण्यासारखं मन-त्यावर ना लाटा ना हेलकावे…
या शांतपणाचा आपल्याला क्षणभर आचंबा वाटतो. मनात कुणीच नाही. कुठं गेले ते सारे… आणि आपण एकले आहोत का उदास आहोत… नाही,नाही;छे! उदासी नाहीच ही. खुशी- खुशीही नाही . गोड पदार्थ बाजूला सारावा, तशी ती खुशी आपोआपच बाजूला झालेली असते. पण हे रिकामपण नसतं.
मग हे काय असतं… काय आहे हे. रिकामं मन .ना आनंद ना विषाद ना तक्रार.. काहीच तर नाही. एक प्रकारची ‘चुपसी ‘ आहे ही. अशावेळेस आपलं मन आपल्याला काही तरी सांगू पहात असतं. फुलावर बसलेल्या फुलपाखराने संवाद साधावा तसं ते मन आपल्याशी सांगत-बोलत असतं.
वो दासतां,जो हमने कही भी हमने लिखी
आज वो खुदसे सुनी है ..नही, उदास नही..
नाही, ही उदासी नसते. गप्प बसणं म्हणजे रुसून बसणं असं जे आपल्याला सहसा वाटत असतं,ती ही स्थिती नसते . ही वेगळीच- अनुभवावी अशी मन:स्थिती असते.
अशा या मन:स्थितीची हकीकत गायक-संगीतकार हेमंत कुमार यांनी मोठ्या( नाही, विशेषणसुध्दा लागू होणार नाही, एवढी निर्वीकार अवस्था असते ही ) स्वत:ला सांगितली आहे.गीतकार आहेत गुलजार; आणि सिनेमाचं नावसुध्दा या मन:स्थितीशी जुळणारं,असं.. सन्नाटा.
again a nice article
ekant samori asta sandhecyha katarveli
je mala bilaguni hote te kewal shabdach hote
– v. kinhalkar
d song u have given also is again
words we are literaly never without words
मस्त!
निवांतपणाची पोकळी? त्या पोकळीत ’काही नाही’ ची खंत नाही असलं तर समाधानच आहे.
काका, आता तुमच्या पोतडीतून
’दोघांमधले अबोलपणे जाणारे पण रिकामे नसणारे क्षण’
यावरचे शेर काढा.
तुझी मागणी पोतडीत ‘फीड’केली आहे.पाहू या केव्हा उगवेल ते.
kuch dil ne kaha kuch bhi nahi aisi bhi baatein hoti hai …..
खरंच की… चुपसी लगी है- अशा स्थितीतला हा संवाद .मनाची चाहूल घेत जाणारं हे गाणं मोठं छान आहे.
Antarmanatala ha Sannata motha enjoyable asato nahi ?
Yakeenan aaj Dil koi toota hai
Mausam jo rutha huwa hai……
Manachi samajut kadhatana keleli Shikayat nahi tar
samajun ghenyacha prayatna ahe… Khare na..?
Go Ahead… We look forward to many such moments
धन्यवाद !
…कारवां बढता गया..
Nishabd velela nisarg kay kay bolat asavaa. Suma kulkarnichi kavita mhanate
‘ Bolaat maunata tav asate kadhee kadhee
Maunat bolanehee asate kadhee kadhee. ‘
Tumachya lamahe chee athwan mazya hi manaat ek lamha jagvoon geli.
Dhanywad
RK