किशोरकुमारच्या, ‘दूर गगन की छांव में ‘ मधल्या त्या गाण्याच्या निमित्ताने ‘ मिली ‘ मधल्या गाण्याची आठवण मी दिली, आणि त्या अनुषंगाने मित्रांनी त्या गाण्याची हकिकत सांगितली :बडी सुनी सुनी है जिंदगी ये जिंदगी….मै खुद से हूं यहां अजनबी.. ‘ मिली ‘ मधलं हे गाणं. हा एका अर्थाने, एस. डी.बर्मन यांचा शेवट्चा चित्रपट. एस.डी.यांचं हे शेवटचं गाणं .( गीतकार : योगेश ) गाणं तयार होतं. एस.डी. दवाखाण्यात दाखल झालेले होते. असं म्हणतात, की किशोर कुमारने त्यांना दवाखान्यात जावून हे गाणं एकविलं आणि त्याला तिथे रडू आवरलं नाही…
एस.डी.गेल्यानंतर तर किशोर कुमार तीन दिवस गप्प होता. बोललाच नाही.
..आज एस.डींची आठवण येते आहे,किशोर कुमारची आठवण येते आहे .. यांचं हे गाणं ऎकताना,सुनं सुनं वाटत रहातं, द:खाची तीव्रता एवढी वाढत जाते, की स्वत:च, स्वत:शी पारखे होत जातो.. अजनबीपण सतावीत रहातं. कालच्या गाण्यातलं दु:ख हे सकाळ न होणार्या रात्रीचं तर या गाण्यातलं दु :ख अधीक दीर्घ.. अधीक गडद..
[http://www.youtube.com/watch?v=oGXn2idrkL0]
धन्यवाद,
माझ हे सर्वात आवडत गाण आहे. माझा आवडता संगितकार आर डी आहे. पण सचिनदा मात्र संगितात पण त्याचे बाप होते.