जुजबी इच्छा, जुजबी स्वप्न, जुजबी प्रयत्न याचं फलीत मग जुजबी सुख , जुजबी आनंदात होतं आणि असा माणूस मग फारच किरकोळ होवून बसतो. त्याच्यात कसलीच धडाडी रहात नाही ना हिंम्मत. दु:खाची गोष्ट अशी, की माणसाला तसल्याच जुजबीपणात सुरक्षीत वाटत रहातं. असला माणूस मोठी भरारी कशी घेवू शकणार ? अशा जुजाबीपणाचा अंमल चढायच्या पूर्वीच माणसानं सावध होवून ते सगळं झटकून द्यायला पाहिजे. प्रकृतीत तीक्ष्णपणा आणून परीसराकडे, स्वत:कडे पहायला पाहिजे. कष्ट, मेहनत याचं मोल समजून घ्यायला पाहिजे.. आळस झटकून गतीशीलतेची अनुभूती घ्यायला पाहिजे-
रख बुलंद अपने इरादे, काम करता जा सदा
हाथ कब आयी गिजा,शाहीन को आसानी के साथ ( गिजा :भोजन,आहार )
शाहीन पक्षी- ससाणा. त्याची भरारी उत्तुंग असते, त्याची ताकत मोठी, त्याची नजर तीक्ष्ण असते.. आणि तरीही शिकारीसाठी, अन्नासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागते. त्याला सहजा सहजी शिकार मिळत नाही; कारण सहजासह्जी मिळणार्य़ा किडे-मुंग्यावर गुजराण करणारा तो सामान्य पक्षी थोडाच आहे ?
अशा तर्हेने प्रचंड मेहनत करून ,मोठं स्वप्न-मोठं उद्दीष्ट ठेवून कमाविलेली जी श्रीमंती असते, कमाविलेली समृध्दी असते- त्या समृध्दीला बरकत असते. विस्तार असतो, निश्चिंती असते. असा माणूस मनाने मोठा असतो. मेहनतीने कमाविलेल्या श्रीमंतीचा माणूस उतत नाही,मातत नाही. त्याला पैशाचे मोल कळालेले असते, महत्त्वाचे म्हणजे, माणसाचे मोल त्याला कळाले असते. असा माणूस मदत करायला सदैव तत्पर असतोच; शिवाय घरी येणार्या पाहुण्याचा आदराने सत्कार, पाहुणचार करणारा असतो. घरी येणारा पाहुणा त्याला मोठं समाधान मिळवून देणारा असतो-
खुदा करे, मेरे रिज्क की बरकत न चली जाए
दो रोज से घर में कोई महेमान नही है .. ( रिज्क : अन्न,आहार,आजीविका )
घरी येणार्याला जेवू खावू घालून स्वत:ची तृप्ती अनुभवणारा माणूसच समृध्द असतो, श्रीमंत असतो. सार्वजनीक कामात भाग घेणारा मदत करणारा असतो. अशा माणसाला पैशाचा लोभ नसतो.मेहनती माणूस लालची कसा असणार ? त्याला माहित असतं, प्रचंड कष्ट करून पैसा मिळवायचा असतो. विनासायास मिळणारा पैसा, सहजपणाने मिळणारं धन तितक्याच सहज पणाने निघून तर जातंच; शिवाय अशा माणसाला जवळचं- जिव्हाळ्याचं कुणी रहात नाही. म्हणून खरा श्रीमंत कोण ?
है हासिल-ए-आरजू का राज, तर्क-ए-आरजू
मैने दुनिया छोड दी, और मिल गयी दुनिया मुझे
( हासिले- आरजू : अभिलाषा-प्राप्ती . तर्क-ए-आरजू : अभिलाषेचा त्याग )
अविरत कष्ट करणारा माणूस- त्याचं लक्ष लाभाकडे नसतं. लाभ त्याच्या मागे मागेच येतो. आणि असा माणूस जुजबी नसतो. मोठा असतो- मोठ्या मनाचा, मोठ्या हिमतीचा , मोठ्या कर्तृत्त्वाचा आणि अर्थात मोठ्या जिव्हाळ्याचा.
in rain all other birds run away to protect themselves from rain but
it is the eagle who flies above the clouds
tisra sher faar khol ahe . it has many dimensions.
आजचे टिपण फार चांगले जमले आहे. पण प्रचंड कष्ट उपसून हि काही जणांना त्याचा मोबदला मिळत नही, दिसत नाही त्यांचे काय ? असे हि काही आहेत कि जे गिजा मिळण्याची वाट पहात नाहीत
राखते हैं बुलंद अपने इरादे, काम करते हैं सदा
फिरभी हात आती नही गिजा हमको आसानीसे
मजेदारच मुद्दा आहे.. आणि मजेदारच ‘ शे’र ‘! असं वाटतं, की बुलंद इरादा ठेवून आणि काम् करता करताच तो काम करणारा माणूस – किंवा शायर –
( थोडंसं चिडूनच ) हा शे’र खडसावतो आहे. त्याला माझं ( भीत भीत ) उत्तर असं..
न राहे सख्त होती है, न मंझील दूर होती है
मगर एहसास-ए-नाकामी थका देता है राही को.
तिसरा शेर मस्त आहे.
पण माणसांची विभागणी इतक्या सहजतेने शक्य असते का?
हर इक आदमी में होते हैं दस बीस आदमी
जिसको भी देखना है, कई बार देखना..
– निदा फाजली