फ्रेंच व्यंगचित्रकार मोजर याच्या या ( शब्द रहीत ) व्यंगचित्रातला हा वॉर्ड आहे,अपघाताचा – फ्रॅक्चरच्या उपचाराचा. ही वेळ म्हणजे, तसं पाहिलं तर भयाची चिंतेची अन् वेदनेची. वेदना सरली, उपचार झाला तरी, हुंदके उरावेत तसं ते भय उरलेलं असतं.
पण या व्यंगचित्रात आपल्याला एक वेगळीच महिला दिसते आहे. रॅकवरच्या रेडिमेड प्लॅस्टर्सची ती विविधता पाहून स्त्री सुलभ तबीयतीतून तिची वृत्ती जाहीर होते; ती सांगते- हे नको, ते ! प्लास्टर्सचे ते वेगळे रंग, वेगळ्या नक्षी यात ती स्वाभाविकतेने गुंतून जाते. तिच्यासाठी ते प्लास्टर म्हणजे, जणू फुलदाणी !
स्वत: साठी केलेली ही निवड, ही सौंदर्य दृष्टी, हा उल्हास – वेदनेची खबर न ठेवणारा- हा काही सांगण्या बोलण्यासाठी नाही, केवळ मिरविण्यासाठी नाही, तो आहे केवळ तिच्या स्वत:साठी छान रहायच्या वृत्तीतून आलेला हा उत्साह. अन् तिचं ते वागणं पाहून आपल्याला क्षणात एक प्रेरणाच मिळून जाते- वेदनेचं रुपांतर- विरक्ती; नाही,अनुरक्तीत करायची प्रेरणा. व्यंगचित्र पहाताच त्यातल्या गमतीनं हसू येतं अन् त्या नंतर मनात उरून रहाते,ती त्या महिलेची प्रकृती.
नांदेडला बिड्यांच्या कामगारांत तेलंगणातल्या बर्याच महिला असतात. मजूरी करणार्या त्या महिला कामावर जाताना मी पहातो. पहातच रहातो- नेटकं,चोपून नेसलेली लुगडी,साधंच गंघ-टिकलीचं ते रूप ; पण अंबाड्यात मळलेला फुलांचा गजरा -सदैव ! आणि स्वत:त मग्न झालेली,त्यांची ती लगबग … ते पाहून कित्येकदा मला प्रेरणा मिळायची. त्यांचं ते तसं रहाणं, दाखविण्यासाठी- मिरविण्यासाठी अजिबात नसायचं . ते असायचं त्यांच्या स्वत:साठी. पण त्यांची ती स्वत: साठीची सुरेख राहणी इतरांसाठी लक्षवेधी असायची. व्यंगचित्रातल्या त्या महिलेसारखी. उर्दू श’इरा शबनम म्हणते-
जो अपने लिए हमने कहे थे ‘ शबनम ‘
चर्चा है जमाने में उन्ही शे’रों का..
अर्थात, स्वत:च्या सौंदर्य दृष्टीत मग्न असलेली ही महिला केवळ स्वत:तच मग्न असते,असं नाही. पुरूषाला- तिचा जीवनसाथी, त्याला ती तेवढंच महत्त्व देते. तुझ्या विना मी अपूर्ण आहे असं ती सांगते. मीना कुमारी म्हणते –
आगाज तो होता है, अंजाम नही होता
जब मेरी कहानी में, वो नाम नही होता
ती केवळ एवढंच सांगत नाही, ती त्याच्याबद्द्ल केवढ्या अभिमानाने बोलत असते-
गम नही जो लाख तूफानों से टकराना पडे
मै वो कश्ती हूं, के जिसमें कश्ती का साहिल आप है
त्याच्या साथीचं मोल ती जाणून आहे. त्याच्या सहवासातली निश्चिंती ती अनुभवत असते. ‘ सुशिला ‘ मध्ये जां निसार ‘ अख्तर ‘ यांच्या या ओळी मुबारक बेगमने अशा झोकदार तर्हेने गायल्या आहेत, की लक्षात येतं, अवलंबून रहाणं- मग त्याने तिच्यावर किंवा तिने त्याच्यावर, याला दुबळेपणा म्हणणं हा त्या नाते संबंधाचा अपमान आहे. अवलंबनाची ती निश्चिंती, ते सुख..काही औरच असते.
. .. आणि अशा सौंदर्य दृष्टीच्या, संवेदनेच्या, सह-अनुकंपा देणार्या आपल्या स्त्रीबद्द्ल पुरूष गौरवाने सांगतो-
मुझे सहल हो गई वो मंजिले, वो हवा के रूख भी बदल गए ( सहल – सोपी )
तेरा हाथ हाथ में आ गया, के चराग राह में जल गए शायर – मजरूह
… हा केवळ गौरव नसतो, केवळ कौतूक नसतं. तो असतो जीवनाच्या खडतर ट्प्प्यांतून सहीसलामत बाहेर पडण्या करीता सदैव साथ देणार्या त्या स्त्रीच्या साथीचा अनुभव. त्या अनुभवाच्या निमित्ताने व्यक्त केलेली त्याची भावना.
vyang chitra surekh aahe .Tyawarchi tippaNihee.PaN
sher match hot naheet
बरोबर आहे. या टिपणाला ‘तेरा हाथ हाथ में आ गया ‘ असं शिर्षक देण्याऎवजी,
‘ रूप आणि प्रकृती ‘ हे द्यायला हवं होतं.
one of the most beauiful n earabout great article i have ever read
vyangachitratun vyakt honari sanjivak ani vedanevarhi maat karu shaknari soundaryapremi vrutti jila ahe tichyat samarpan v utkat prembhavanahi aasavi ya puushanna vatnarya ecchechi swapnachi apexa ghevun dusra sher yeto ani ya donhi gasti asnarya strichya navryachi manasik awastha tisrya sherat naturally ali ahe
अनिलांची अशीच एक कविता आहे.
अशा काही रात्री गेल्या, ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या, होतो तसे उरलो नसतो.
वादळ असे भरून आले, तारू भडकणार होते
लाटा अशा घेरत होत्या, काही सावरणार नव्हते.
हरपून जावे भलतीकडेच, इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो, इतके पेटून आले होते रान.
डाव असे पडत होते की, सारा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते, जीव पुरा विटून जावा.
कसे निभावून गेलो, कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते – नुसते हाती हात होते.
On Mon, Mar 8, 2010 at 6:43 PM, Ravimukul Kulkarni wrote:
Hujoor ,
Gustakhi maaf !
Bahut der kar di ham ne padhane ke liye.
Kya karun haalat se pareshan hoon.
Bahut mazaa aaya .
Subhaan alla !
Uparwaala aap ko hamesha salamat rakhen.
– naacheej
This I suppose the special gift on occassion of world Mahila day. Good combination of cartoon and sher
[…] The busiest day of the year was March 8th with 155 views. The most popular post that day was तेरा हाथ हाथ में आ गया.. . […]