सचिन…तुला मॅचमध्ये पहाणं हा आनंदाचा भाग. तुझं शतक पाहाणं हा तर पुत्रप्राप्तीचा आनंद. तुला मैदानात पाहणं ,तुझं वागणं बोलणं, वावरणं पहाताना एवढा आनंद होत असतो,एवढं सुखाचं असतं ते,काय सांगावं… आमचं भाग्य आहे हे, की तुझ्या कारकिर्दीत आम्ही हयात आहोत. प्रत्येक शतकानंतर कसल्याही उत्तेजना न दाखविता तू आकाशाकडे पाहून तुझ्या तर्हेनं व्यक्त होतोस…
तू सामान्य खेळाडू नाहीस. क्षुल्लक हावभाव, क्षुल्लक टीका टिप्पणी, क्षुल्लक चमकदार पण बेजबाबदार खेळी ही तुझी तबीयत नाही. तू मोठा आहेस . तुझं स्थान कितीतरी उंचावरचं आहे-
नही तेरा नशेमन कैसर-ए-सुलतान की गुंबद पर
तू शाहीन है , कर बसेरा पहाडों की चट्टानों पर
असं डॉ. इक्बाल यांनी म्ह्टलं आहे : सम्राटांच्या घुमटांवर घरटं करून रहाणार्या साध्या सुध्या पक्ष्यांसारखा तू पक्षी नाहीस. तू तर आहेस घारीसारखा, ससाण्यासारखा मोठा, मोठी झेप असलेला रुबाबदार पक्षी. पर्वतांच्या शिखरांवर अशा पक्ष्यांचा वावर असतो, निवारा असतो. तू तसा आहेस.
आज, आत्ता तुझी दोनशे धावांची ती अविस्मरणीय खेळी पाहिली आणि भरून पावलो. तुझं बोलणं,तुझं वागणं यात कमालीचा सभ्यपणा आहे. तुझ्याकडे पाहिलं, की पटून जातं-
अच्छे बुरे का मेल ही क्या
नूर जुदा,जुल्मात अलग ( नूर : तेज, प्रकाश. जुल्मात : अंध:कार )
( शायर : मुश्ताक )
भारतीय क्रिकॆटला तू शिखरावर नेलंस. तुझ्यासारखी माणसं इतिहास घडवितात. तुझा विजय असो ! तुझा हवाला देवून आम्ही जगाला अभिमानाने सांगू-
इ न्सान नही है वो, जो हवा के साथ बद्ले
इन्सान वही है, जो हवा का रुख बदले
वा! आजचा आमचा दिवस- आमचं आयुष्य तू सार्थक केलंस.
Wah.
sagle blog apratim ahet.
Sachin baddalcha vishesh apratim.
Sagalya Bharateeyanchya bhavanach tumhi vyakt kelya
ase vatate.Dr. Iqbal yancha Sher atyant samarpak.Wah…
Blogcha ha majkoor Maharashtra Timeskade pathwa.
Sachinla swtahala ha majkoor khoop awadel.
अप्रतिम! खूपच छान लिहीलं आहे
Kaka,
khup chaan lihilay.
Sachin shi asalela aapala naat hey farach bhavneek aahe aani te titkyaach sundar shabdaat ithe madala aahe.
Dhanyawad itka apratim waachayala dilya baddal
काका,
वा !
’सचिन’ वर लिहिलंत तुम्ही आणि एकदम जास्तच ’माझिया जातीचे’ वाटू लागलात. कितीतरी वेगवेगळ्या कोनातून पाहिलं तरी त्याचं असामान्य असणं इतकं ठसत जातं…
परवाच्या पहिल्या मॅचमधल्या शेवटून २रा चेंडू अडवण्यासाठी त्याने आकांताने मारलेला सूर मला अजूनही थक्क करतो. २० वर्षे शिखरावर काढल्यावर, ३६व्या वर्षी याला हे motivation येतं कोठून ? अजून एखाद्या महिन्यात विसरून जातील अशा या मॅचेसमध्ये असं पणाला लावण्याइतकं या खेळावर प्रेम ? आज गावस्करने म्हंटल्याप्रमाणे त्याच्यात आजही एक १० वर्षाचं मूल जागं आहे. पैसा, कीर्ती, आरोप, विक्रम या सगळ्याच्या दोन अंगुले वरती राहणारं मूल.
कालचा एकही क्षण live पाहता (आणि netवर वाचताही live आला नाही) याची खंत आहेच पण…
माझ्या आयुष्यातल्या कितीतरी सुगंधी, देदिप्यमान क्षणांवर सचिनचे नाव कोरले गेले आहे. (ओल्ड ट्रॅफोर्ड १९९०, पर्थ १९९२, हीरो कप ९३, शारजा ९८, चेन्नाई ९८, चेन्नाई ९९, ब्रिस्टॉल ९९, विश्वचषक २००३,…….). तुमच्या लेखाने खूण पटली की तुमच्याही बाबतीत हे खरे असणार.
AWESOME!
🙂
Kaka,
waa kai chan lihile ahe ho. sachin che evdhe mothe kartutva. pan thoda hi garva tyachya cheharyavar nahi he kiti mothe and kathin yogassan aahe.
Nishant
apratim. khas lekh ahe ekdam
I dont know who you are, but just noticed that you started this blog in Oct 2007 and made your reappearance now. I would certainly like to tell you that, whatever you are writing, its very very awesome. Just keep writing. There are very few blogs (or none) in Marathi where we get to read about asha’aar. Please, dont take halt now.
आभारी आहे. उर्दू शाय्ररीचा जो ‘ *फलसफाना अंदाज *’ आहे, त्याच्या मोहात कित्येक वर्षं मी आहे. आता मला व्यक्त होण्याचा मार्ग सापडला आहे, असे वाटते… आणि तुमच्यासारखे हमसफर मिळाल्यावर तर काय ! .. *खूब गुजरेगी जो मिल बै ठेंगे दिवाने दो*.. माझ्या सोबत असे दिवाने वाढ्त आहेत. धन्यवाद ! मधुकर धर्मापुरीकर
उर्दू ही अप्रतिम भाषा आहे…भाषेचा बाज, वापर, इतिहास, काव्य, सगळेच अद्भुत आहे….काचमहालच आहे शब्दांचा…ऐकावी तेवढी अजूनच ऐकायचं इच्छा होते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ ही उक्ती उर्दू शायरीलाही लागू पडते खरं तर…’नक्श फरीयादी’ आहे…बाकी काही नाही.
sachin baddal sagalech lihitat parantu tumhi je lihile ahe te ekdam sunder ahe , asech lihit jane
keep it up!!!!!!
-sudhu
Pesh hai…….Udane ka tera yahi hai Andaz
To Asman se kah do Thoda aur Oncha Ho Jaye…….Itakach mi mhanu shakato. Kami Shabdateel
urdu che vazan tumchya shabdat nasate tar to fakt
Arth sangitlyasarakhe zale asate.. Bravo…!
Awsome!!
काका…सहीच…हा ब्लोग मला नेहमी attract करायचा शायरी मूळे…मला आवडते (पण फारसे काळात नाही त्यातले ) आता सचिन बद्दल वाचताना एक गोष्ट जाणवली म्हणजे त्याची शतक केल्यानंतरची style ..मी नुकतेच सचिन बद्दल लिहिले आणि त्यातही त्याची हीच अदा highlight केली 🙂
Sachin ke liye jo likha hai wo bilkul uski kamyabi ka sahi andaaz me bayaan hai. aapki koshish bhi kamyab hui!!
Thanks !
[…] तू हो जमीं पे और तेरी सदा आसमानों में̷… February 2010 16 comments 3 […]