तमाम जिंदगी गुजरी,बिना इबादत के
बगैर खुद के, किसी और को देखा ही नही ( इबादत : उपासना,आराधना )
आयुष्याच्या सरत्या काळात कधी मागचे दिवस आठ्वतात. आपण जे केलं, ते बरोबरच केलं, योग्य केलं असं जे आपल्याला नेहमीच वाटत असतं, ते वर्तमानात, आत्ताच. आपण आपल्या समर्थनातच सगळं आयुष्य घालवतो. पण जेव्हा मागच्या दिवसांचा विचार आपण करतो,तेव्हा संवेदनशील मनाला एक प्रकारचे भान येते. स्वत: ची उलटतपासणी करायची ही मन:स्थिती.. अर्थात ही वेळ सुध्दा शहाणपणाची, सावधपण आल्याची असते. भाग्याची असते. कित्येक जणांच्या आयुष्यात असा अवधी येतच नसतो- सायकलचे हॅंडल वाकडे असले, की ती तिरपीच फिरत रहावी, तसे होत असते- तो माणूस अखंड तिरपा फिरत असतो. …(अशी माणसं हातात नेहमी आरसा घेवून वावरणारी- यात कधी आपणही असतो- कुठेही वारताना,वागताना-बोलताना त्यांचं लक्ष नेहमी आरशाकडेच-स्वत:कडेच असतं.)
म्हणजे अश्रध्द माणूस आत्मकेंद्रित असतो. इथे श्रध्दा म्हणजे केवळ इश्वरावरची श्रध्दा असं नसून प्रत्येक गोष्टीबद्द्लची जाणिव ठेवणारं मन, इतरांबद्द्ल सह-अनुकंपा ठेवणारं मन असं अभिप्रेत आहे.
हा अनाम शायर तसा नाही. स्वत: बद्दल त्याला भान आलेलं आहे. एक प्रकारच्या विषादाने तो सांगतो आहे – सगळं आयुष्य माझं उपासनेशिवाय गेलं. श्रध्देशिवाय मी घालविलं.. मग मी काय केलं आजपर्य़ंत ? स्वत: च्या बाहेर कधी पाहिलंच नाही. मी, मीच सगळा पाहिला इथे तिथे.. श्रध्देचं महत्व इथे त्याला कळून आलेलं आहे. ज्याच्या मनात श्रध्दा असते, त्याचं लक्ष स्वत: सोबतच इतरांवरसुध्दा असतं. इतरांचं मोल असा माणूस जाणून असतो.
या शायरला तशी अनुभुती झाली- आणि त्याची इबादत सुरू झाली…
APRATEEM !
mast lekh aahe. Ajach LK ne ullekh kela aani blog ughadla. Chhan
R.K. Deshpande
स्वांत सुखाय ! चार्वाक ची आठवण झाली.
“विपश्यना साधना” ही पण आठवली. विपश्यने बाबत चे माझे लेख सावधान च्या दिनिकेवर (ब्लोग)आपण वाचले असावेत असं वाटत.
वा ! ब्लॉग वाचला. विपश्यना मीही केली आहे. ‘ दीपलक्ष्मी ‘ दिवाळी अंकात त्यावर
माझा मोठा लेख आहे. आध्यात्म विषयाच्या क्षेत्रात सर्व संत, सर्व कवी-कलावंत ,सर्व धर्म सारखेच असतात हा अनुभव मोठा सुख देणारा असतो.
utkrusht vivechan ahe… tumacha blog farach awadala buwa apalyala…