काही माणसांच्या तोंडात विस्तव असतो. तोंडात विस्तव ठेवून बोलणार्या माणसाची- त्याची स्व:ताची जीभ होरपळून निघतेच;शिवाय समोरच्या माणसाच्या डोळ्यांत धूर गोळा होतो. अशी माणसं मदत करतात,पण तीव्र शब्दांत बोलून. अर्थात सहानुभुती दाखवायची त्यांची ती पध्दत असते. मनातून ती काही तशी वाईट नसतात. एका एकाच्या तर्हा…
माणसाच्या जीभेवर नेहमी लोणी पाहिजे- असं लोणी म्हणजे पुढे पुढे करणं, लाडी गोडी करणं असं अजिबात नाही. तशी माणसं वेगळी.( ती कधीच ‘आपली ‘ वाटत नसतात. ) जीभेवर लोणी असलं, की त्याची भाषा मुलायम होते. जखमी माणसाला अशा माणसाचं बोलणं मलम असतं,फुंकर असते. पण काही माणसं गमतीची असतात. त्यांची इच्छा असूनही, का कोण जाणे त्यांच्या बोलण्यात विनाकारण तीव्रता येवून जाते- केलेलं सगळं, असा माणूस बोलून घालवून टाकतो, असा आपला अनुभव. अशा माणसांसाठी हा शे’र –
कुछ यूं मेरे जख्म का उसने किया इलाज
मरहम भी गर लगाया, तो कांटे की नोक से
… प्रेमात पडलेल्या त्या शायरला मेहबूबा अशी मिळाली होती, की तिच्या कडे त्याच्या विरहाचा इलाज तर होता, पण ‘ जालीम’ होता. फटकळ भाषेचा. पण प्रेम हा आजारच असा, की तो इलाजही मस्त वाटत राहतो. म्हणून तर ग़ालिबने म्हटलं आहे-
कितने शिरीन है , तेरे लब के रकीब ( शिरीन : गोड. रकीब : शत्रू ; इथे प्रेयसीला उद्देशून )
गालियां खा के बे-मजा न हुवा
भारीच आहेत हे शायर!
मला वाटलं हे त्या प्रेयसीच्या प्रेमात पडले आहेत? की भाषेच्या?
प्रेयसी आणि भाषा… दोन्हीच्या प्रेमातले हे शायर.
धर्मापुरीकर, हा शायर खरोखरच जबर्द्स्त आहे. पण फटकळ पणाने नुकसान च होतं ना? कुठल्या ही क्षेत्रात-प्रेम असो वा व्यवहार !
psychiatry madhe masochism naavacha prakar asto, jithe maar khaun mansala maja yete,tyatla tar ha prakar navhe !
chhan,unusual sher!