जमा करती है मुझे रात बडी मुश्किलसे
सुबह को उठता हूं बिखरने के लिए....
दिवसभर विविध व्याप-तापात मी गुंतून असतो.विस्कळीत झालेला असतो.सकाळी घराबाहेर पडलेला मी,रात्रीच घरी येतो ते विश्रांतीसाठी.झोपेच्या आधीन होण्यासाठी…माझी रात्र मोठ्या कष्टाने मला जवळ घेते.भरकटलेल्या माझ्या स्थितीला एकत्र करते.पुन्हा मी साकाळी उठतो,ते बिखरण्यासाठी..दिवसभर मी एवढा व्यस्त असतो,की माझं मलाच समजत नाही, मी कुठे आहे-कसा आहे..माझे विचार, भावना, चित्तवृत्ती सगळं विखुरलेल्या स्थितीत असतं. माझ्याजवळ मी नसतो. थकतो भागतो, रात्री मग बिछान्यावर अंग टाकून देतो. मग आईने जवळ घ्यावं तसं माझी रात्र, माझी झोप मला जवळ घेते. गोंजारते… मी तिच्या आधीन होतो..
सकाळी पुन्हा खेळायला जावं तसं विखरून जाण्यासाठी.
प्रतिक्रिया व्यक्त करा