गुमगश्तगी में मंजिले-मख्सूद मिल गयी / अच्छा हुवा,के छूट गए कारवां से हम
गुमगश्तगी… भरकटणे.. उद्दीष्ट सोडून उद्देश सोडून भरकटणे..मध्यमवर्गिय मानसिकतेतून पाहिलं, तर असं वागणं मूर्खपणाचं.. आपलं प्रत्येक काम, प्रत्येक कृती ही उद्देश घेवून आलेली असते. नियोजनानुसार चालणे हेच आपले काम. जो नियोजनानुसार चालत नाही , तो आपल्या नजरेतून वेडा…
या श’रमध्ये मात्र त्या अनामिक शायरला त्याच्या वेडेपणातूनच त्याचे घ्येय गवसले आहे. सगळ्यांनी ठरवून दिलेल्या मार्गाला झुगारून तो निघाला होता..आपल्याच मस्तीत जावू लागला होता… आपल्या या प्रवासात तो भरकटलासुध्दा… पण गडबडला नाही, गोंधळला तर अजिबात नाही. आणि या भरकटण्यातून त्याला त्याचं ध्येय गवसलं की ! मंजिले-मख्सूद… ( हा शब्द आपल्याला यापूर्वी भेटलेला आहे – ‘ संगम ‘ मध्ये मुकेश म्हणतो- तेरे दिल के पास ही है मेरी मंजिले-मख्सूद… ) प्रत्येक गोष्टीत फायदा ‘ हुंगणारा’ माणूस, त्याला यश मिळेल, पण आनंद मिळेलच असं नाही. म्हणूनच आणखी एका माहित नसलेल्या शायरने ( पण बहूतेक हा शायर ‘ फिराक गोरखपुरी’ असावा.)म्हटलेलं आहे-
पूछते हैं फायदा क्या इश्क से
पूछिए , क्या फायदे से फायदा !
काका,
मस्त!
माझ्यासारख्या main-stream सोडून भरकटलेल्यांना तर आवडण्यासारखाच आहे. भरकटलेल्यांपैकीही कुणा कुणाला मंजिले-मख्सूद गवसू शकते ही तर आनंदाचीच गोष्ट. (का खरी मंजिले-मख्सूद त्यांनाच गवसते?)
विद्या
yachyashi similar Vindanchi ek kawita ahe –
चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या धृवाचे
हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो त्याला वाटेल तेथ न्या रे.
आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..
वा ! कित्ती छान गजल आहे. विंदाच्या रचना वाचून असं वाटतं, गालिबचं म्हणणं
विंदांनाही तंतोतंत लागू आहे-
है और भी दुनिया में सुखन्वर बहोत अच्छे
कहते है के गालिब का ( और विंदांका !) है अंदाजे-बयां और
विंदांची ही कविता अच्युत पालवांच्या लेखनशैलीत येथे पाहा.