खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना
-सिमाब अकबराबादी
..आपल्या द:खाचं प्रदर्शन करावं,असं कुणालाही वाटत नसतं.पण दु:ख लपवूनही ठेवता येत नाही.ते कुणालातरी सांगावसं वाटत असत
आणि जगाला आपल्या दु:खाबद्दल काय वाटात असतं नेमकं ?
परदु:ख शीतल हे जसं खरं,तसं दुसर्याचं दु:ख खमंग वाटत असतं अनेकांना.अशा वेळी दु:खात असणारा माणूस गप्प रहातो.दु:खाबद्द्लची विचारपूस सहानुभूती या सर्वांचा वीट येतो अन् वाटतं नकोच ते.मग आपल्या दु:खाची कहाणी आपण आवरती (कोताह)घेतो..जगाला मोठं वाटत असतं,याच्या दु:खाचा खेळ मांडावा. .
प्रतिक्रिया व्यक्त करा